ETV Bharat / state

हिंगोलीत अवयदान जनजागृती फेरी; शहरातील अनेक महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग - महिला डॉक्टर

अवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. मृत शरीरावर अत्यंसंस्कार झाल्यानंतर ते शरीर नष्ट होते. मात्र, याच शरिराचे अवयदान केल्यास हेच शरीर अनेकांसाठी जीवनदान ठरु शकते. यासंदर्भात शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.

अवयदान जनजागृती फेरी
author img

By

Published : Sep 1, 2019, 7:17 PM IST

हिंगोली - प्रत्येक व्यक्तीसाठी शरीर हे खूप अमूल्य असते. मात्र, प्राणज्योत मालवल्यानंतर हेच शरीर इतरांसाठी जीवनदान ठरू शकते. त्यासाठी प्रत्येकाने अवयवदान केले पाहिजे. या संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने, हिंगोली येथील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, शाखा हिंगोली आणि नेत्रदान समितीच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

हिंगोलीत अवयदान जनजागृती फेरी
या रॅलीमध्ये हिंगोली शहरातील महिला डॉक्टर, भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या सदस्य आणि शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. मृत शरीरावर अत्यंसंस्कार झाल्यानंतर ते शरीर नष्ट होते. मात्र याच शरीराचे अवयदान केल्यास हेच शरीर अनेकांसाठी जीवदान ठरु शकते.

यामुळे आपले अमूल्य अवयव हे जाळून नष्ट करण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनाला सावरण्यासाठी दान केले पाहिजे. हाच एकमेव संदेश देण्यासाठी सर्व महिला डॉक्टर, मारवाडी महिला संघ आणि नेत्रदान संघटनेच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती. या जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल,अशी अपेक्षा यावेळी महिला डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Intro:*
अखिल भारतीय मारवाडील महिला संघाची जनजागृती साठी रॅली

हिंगोली- आपले शरीर हे खूप अमूल्य आहे. तसेच दुसऱ्याचे पण आहे. मात्र आपली प्राण ज्योत मालवल्यानंतर अपले शरीर इतरांसाठी जीवदान ठरू शकते. त्यामुळेच आपण आपले अवयव दान करावे यासाठी हिंगोली येथे अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन शाखा हिंगोली आणि नेत्रदान समितीच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढली.

Body:या रॅली मध्ये हिंगोली शहरातील सर्वच महिला डॉक्टर आणि भारतीय मारवाडी महिला संमेलन च्या सदस्य व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अवयव दान हे जीवनामध्ये अतिशय महत्वाचे आहे. ज्याने अवयवदान केले त्याच्या अव्यवमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. आपले शरीर मूत झाल्यानंतर त्याच्या वर अत्यंसंस्कार झाले तर आपले अवयव पूर्णपणे जळून जातात. मात्र एखाद्याचा मृत्यू होताच त्याच्या नातेवाईकानी दुःखातून स्वतःला सावरत मृत व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला तर आपली मृत व्यक्ती अनेकांच्या रुपात जिवंत राहू शकेल. Conclusion:त्यामुळेच आपले अमूल्य अवयव हे जाळून नष्ट करण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनात दिले तर आपल्याला ही समाधान लाभेल. हाच एक मेव संदेश देण्यासाठी सर्व महिला डॉक्टर आणि मारवाडी महिला संघ, नेत्रदान संघटनेच्या वतीने ही रॅली काढली. जनजागृतीला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ही महिला डॉक्टरने व्यक्त केली. आता खरोखरच या रॅलीद्वारे जनजागृती झाली तर किती जणांना जीवनंदान मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.