हिंगोली - कोरोना लाट अजूनही कमी झालेली नाही, सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग रात्रंदिवस एक करीत लस देण्यासाठी धडपड करीत आहे. लस देण्यासाठी परिचारिका घरांचे उंबरवठे झिजवत आहेत. तरी ही बरेच जण लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आता लस न घेणाऱ्याला पेट्रोल न देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. पेट्रोल भरायला जाताना प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
लस न घेणाऱ्याला पेट्रोल देखील न देण्याचे आदेश -
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे भय अजूनही संपलेले नाही. मात्र कोरोनापासून बचाव करता यावा, यासाठी आरोग्य यंत्रणा अक्षरशः जीवाचे रान करत आहे. तसेच बऱ्याच ग्रामपंचायतीने देखील कोरोना लसीची जनजागृती केली. एवढेच नव्हे तर लस असेल तर ग्रामपंचायत प्रमाणपत्र देण्यात येतील, असा ठराव घेतलेला आहे. त्यातच आता लस न घेणाऱ्याला पेट्रोल देखील न देण्याचे आदेश थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता पहिली किंवा दुसरी लस घेणाऱ्यांनाच पेट्रोल दिले जाणार आहे. लस न घेणारा पेट्रोल पंपावर गेला तर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नजीकच्या कोणत्याही आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत.
डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा अन पेट्रोल भरा -
आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करत लसीकरण मोहीम राबवत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक वेळ लस उपलब्ध करून दिली आहे. तसेच घरोघरी फिरून ही लस घेण्यासाठी कर्मचारी विनंती करीत आहेत. तरी बरेच या विनंतीला जुमाणेंनात त्यामुळेच जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता निश्चितच लसीकरणाची आकडेवारी वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - MLC Election 2021 : विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध, तर दोन जागांवर होणार लढत