ETV Bharat / state

महावितरणचा अजब कारभार... वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला एक लाखांचे बिल - farmer news hingoli

विठ्ठल कचरू धवसे या शेतकऱ्याकडे वीज जोडणी नसताना देखील महावितरणने 1 लाख 10 हजार 650 रुपये वीज बिल दिले आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

one-lakh-bill-to-farmer-without-electricity-connection-in-hingoli
वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला एक लाखांचे बिल
author img

By

Published : Feb 17, 2020, 6:52 PM IST

हिंगोली - शेतकऱ्याकडे वीज जोडणी नसताना देखील त्याला चक्क महावितरणने 1 लाख 10 हजार 650 रुपये वीज बिल दिले आहे. आपल्याकडे वीज जोडणी नसताचा एवढे बिल आल्याचे पाहून भोळाभाबडा शेतकरी विवंचनेत पडला आहे. विठ्ठल कचरू धवसे (रा. फळेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला एक लाखांचे बिल...

महावितरण कंपनीचा कारभार दिवसेंदिवस बेताल होत चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विठ्ठल यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते. त्यानंतरही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. दहा वर्षांपासून ते महावितरण कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र, त्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, त्याऐवजी त्यांना 1 लाख 10 हजार 650 रुपयाचे वीज बिल मिळाले आहे.

हेही वाचा- सत्य बाहेर येईल म्हणूनच पवारांचा 'एनआयएला' विरोध - फडणवीस

विठ्ठल यांनी 06 फेब्रुवारी 2010 मध्ये विद्युत जोडणीसाठी 5 हजार 750 रुपये कोटेशन भरले होते. तेव्हापासून ते विद्युत जोडणी मिळवण्यासाठी नियमित महावितरणच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, त्यांना वीज जोडणीच्या अगोदर वीज बिल मिळाले आहे. त्यामुळे ते बिल भरायचे कसे, असा सवाल विठ्ठल यांना पडला आहे.

विद्युत जोडणी नसताना बिल येण्याचे हे जिल्ह्यातील नविन प्रकरण नाही. याआधीही असे अनेक प्रकार घडलेले आहेत. मात्र, या प्रकाराने मागील प्रकाराला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. आता यावर महावितरण काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.