ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये रात्रीची संचारबंदी कायम, जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश - Hingoli District News Update

1 ते 7 मार्च या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता मात्र 8 मार्चपासून रात्रीची संचारबंदी कायम ठेऊन दिवसा शिथिलता देण्यात आली आहे. मात्र दिवसा मोजक्याच सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दुकाने बंद राहणार असून, व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

हिंगोलीमध्ये रात्रीची संचारबंदी
हिंगोलीमध्ये रात्रीची संचारबंदी
author img

By

Published : Mar 8, 2021, 2:45 AM IST

हिंगोली- 1 ते 7 मार्च या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता मात्र 8 मार्चपासून रात्रीची संचारबंदी कायम ठेऊन दिवसा शिथिलता देण्यात आली आहे. मात्र दिवसा मोजक्याच सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दुकाने बंद राहणार असून, व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पुन्हा एकदा व्यापारी महासंघ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेण्याच्या तयारीत आहे.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आज नवीन आदेश काढले असून, जिल्ह्यातील विशिष्ट सेवा आणि व्यवसायासंदर्भात सूट असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र यामध्ये बहुतांश व्यवसाय येत नसल्याने व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाने व्यापारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. किराणा दुकाने आणि कृषी बाजार उत्पन्न समित्या या सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सातपर्यंत सुरू राहातील. तसेच भाजीपाला, फळ, मांस, मच्छी, मटन व दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, ही दुकाने सकाळी 10 ते दुपारी तीनपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच मेडीकल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

प्रवाशांनी अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र बाहेरून येणारी बस स्थांनाकाच्या व्यतिरिक्त कुठे ही थांबणार नाही. मुख्य म्हणजे बसमधून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटीजन चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच व्यवसायिकांना देखील अँटीज टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. तर रिक्षांमधून केवळ तीन जणांनाच प्रवास करता येणार आहे.

शासकीय कार्यालय वेळेनुसार सुरू राहाणार

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय हे वेळेनुसार सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत सुरू ठेवले जाणार असून, लग्न समारंभात केवळ पन्नास व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल, बार हे मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. मुख्य म्हणजे सर्व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.