हिंगोली - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. सोमवारी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 17 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा हा 575 वर पोहोचला असून, 372 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यपरिस्थितीत 197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नव्याने आढळेल्या रुग्णांपैकी हिंगोली शहरातील गाडीपुरा भागात 3, मेहराज कॉर्नर 1, आझम कॉलनी 1, मंगळवारा 3, राज्य राखीव दल 4, श्रीनगर वसमत येथील सोमवार पेठ 1, पठाण मोहल्ला येथे 1 रुग्णाचा समावेश आहे. तर 6 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी दिली आहे. तर हिंगोली येथे 6 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोली शहरात नियमित वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचही तालुक्यांमध्ये ज्या ज्या भागात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तो भाग प्रशासनाच्या वतीने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात सोमवारी 7 हजार 924 कोरोनाबाधितांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 83 हजार 723 अशी झाली आहे. तसेच नवीन 8 हजार 706 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2 लाख 21 हजार 944 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 592 सक्रिय रुग्ण आहेत.