हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 410 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 310 रुग्ण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला 100 कोरोनाबधित रुग्णांवर विविध कोरोना वार्ड आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमधील 7 जण हे शहरातील खडकपुरा भागातील आहेत. तलाबकट्टा परिसरात 5 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कोरोनाबाधितांमध्ये जळगाव येथील बालाजी नगर भागातील दोन पुरुष आणि एका स्त्रीचा समावेश आहे. तसेच समतानगर भागातील 45 वर्षीय पुरुषाला कोरानाची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत.
वसमत येथील स्वानंद कॉलनी भागातील एका 41 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील रुग्णाला सर्दी-खोकला असल्यामुळे त्याला तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या बाळापूर येथील 3 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर औरंगाबाद व मध्यप्रदेशातून आलेले कांडली येथील दोघे जण कोरोनाबाधित आढळले आहेत. पुणे येथून कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे आलेल्या एका 30 वर्षीय पुरुषाचा देखील अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे, आशा प्रकारे एकूण 23 नवे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली गावे सील करण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू झाली आहे. तसेच शहरातील विविध भागातही रुग्ण आढळून आल्याने तो भाग देखील सील केला जात आहे.
11 जणांची कोरोनावर मात - हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या तलाब कट्टा 1, गांधी चौक 1. दौडगाव 2, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील कळमकोंडा 4, तलाबकट्टा 1, भांडेगाव 1, हनवतखेडा 1, आशा एकूण 11 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज घडीला कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या 891 पैकी 289 जनांचे अहवाल हे प्रलंबित आहेत.