हिंगोली- दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हेही वाचा- 'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठातील संरक्षण भिंतींच्या आत शिरून तोंड झाकून आलेल्या गुंडांनी हल्ला केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध केला जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली येथील राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देत या गुंडांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या गुंडांची पाठराखण करणाऱ्या केंद्र सरकारचाही निषेध केरण्यात आला आहे. यावेळी घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.