ETV Bharat / state

जमिनीतून येणाऱ्या गूढ आवाजाने कळमनुरी तालुक्यातील गावे हादरली, नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण - earthquake tremors news

जिल्ह्याच्या वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले होते. हे भूकंपाचे हादरे असावेत असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मंगळवारी घडलेल्या या घटनेमध्ये कुठेही भूकंपाची कुठेही नोंद झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

कळमनुरी तालुक्यातील गावे हादरली
कळमनुरी तालुक्यातील गावे हादरली
author img

By

Published : May 14, 2020, 11:53 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास या भागातील काही गावात दोनवेळा जमिनीतून गूढ आवाज झाल्याने, ग्रामस्थ भयभीत होऊन रस्त्यावर येऊन थांबले होते. या भागात अधूनमधून गूढ आवाज येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या आवाजाचे गूढ अजूनही उकलले नसून या घटनेत भूकंपाच्या हादऱ्यांसारखी कुठेही नोंद झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे, वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा, तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, बोल्डा गावात मंगळवारी रात्री जमिनीतून गूढ आवाज येऊ लागला. या भागात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे संकटात सापडलेले हिंगोलीकर कसेबसे सावरत असताना, आता जमिनीतून येणाऱ्या गूढ आवाजांमुळे नागरिक चांगलेच हादरून गेले आहेत. या भागात मंगळवारी रात्री सलग दोनवेळा आवाज आल्यामुळे ग्रामस्थांनी घराच्या बाहेर अंगणामध्येच रात्र काढली.

या प्रकाराबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे या आवाजांचे गूढ उकलण्यासाठी मागणीदेखील केली आहे. मात्र, अद्याप या आवाजाचे गूढ उकलण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. परिणामी या भागात जमिनीतून गूढ आवाज येण्याची ही मालिका कायम सुरू आहे. एवढेच नव्हे तर वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील घटनेनंतर औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागांमध्येही जमिनीतून गूढ आवाज येतोय. त्यामुळे कळमनुरी, वसमत पाठोपाठ औंढा नागनाथ तालुक्यातीलही काही गावांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते. तर दुसरीकडे मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेमध्ये भूकंपाच्या हादऱ्यांसारख्या घटनेची कुठेही नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.