ETV Bharat / state

पानकनेरगावात मुरूम चोरी, शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

शेख अकबर शेख मुसा या शेतकऱ्याच्या शेतातील मुरूम आणि माती चोरीली गेली आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

Hingoli
पानकनेरगावात चक्क मुरूम चोरी
author img

By

Published : Feb 20, 2020, 6:35 PM IST

हिंगोली- पानकनेरगावात एका शेतकऱ्याच्या शेतातील मुरूम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जमीन मालकाने संबंधित ठेकेदाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शेख अकबर शेख मुसा असे शेतकऱ्याचे नाव आहे.

पानकनेरगावात चक्क मुरूम चोरी

मुसा यांच्या शेतीपासून काही अंतरावर रिसोड-हिंगोली या मार्गे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या शिवालय कंपनीच्या ठेकेदारांनी कोणतीही परवानगी न घेता व मोबदला न देता खडक व माती चोरून नेल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. त्यामुळे जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अकबर शेख मुसा यांची सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे गट क्रमांक 189 मध्ये 94 आर एवढी शेतजमीन आहे. तर ते कामानिमित्त परभणी येथे वास्तव्यास राहतात. शेख मुसा दरवर्षी नियमित याच शेतीमध्ये उत्पन्न घेतात. यंदाही ज्वारी, सोयाबीन पिकाचे त्यांनी उत्पन्न घेतले. शेतातील कामे आटोपल्याने ते बरेच दिवस शेताकडे गेले नाहीत. त्यानंतर ते शेतात गेले असता, त्यांना शेतातून मुरूम चोरून नेल्याचे आढळले.

या प्रकरणाची चौकशीसाठी शेख हे सेनगाव येथील शिवालय कंपनीच्या कार्यालयात गेले असता, त्यांना पवन राठी यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे शेख यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.