ETV Bharat / state

हिंगोलीत तालुक्यात मित्राकडूनच जवानाचा खून

हिंगोली तालुक्यातील लोहगाव शिवारातील विहिरीत जवानाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मित्रानेच काटा काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले.

हिंगोलीत तालुक्यात मित्राकडूनच जवानाचा खून
हिंगोलीत तालुक्यात मित्राकडूनच जवानाचा खून
author img

By

Published : Mar 18, 2021, 7:03 PM IST

हिंगोली - तालुक्यातील लोहगाव शिवारातील विहिरीत जवानाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मित्रानेच काटा काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मित्रा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बंडू श्यामराव चव्हाण, असं आरोपी मित्राचं नाव आहे. मयत राजकुमार पवार हे आपला मित्र बंडू चव्हाण यांच्यासोबत मंगळवारी जांभरून तांडा येथे पाहुण्याकडे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री नऊच्या सुमारास हिंगोली मार्गे कारने परत निघाले होते. दरम्यान, त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये दोघात कडक्याचा वाद झाला. हाणामारी देखील झाली. हीच संधी साधून बंडू चव्हाणने जवान राजकुमार पवार यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर मृतदेह लोहगाव शिवारातील विहिरीत फेकून दिला.

वडिलांच्या फिर्यादीवरून केला गुन्हा दाखल-

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवान पवार यांचे वडिल उत्तम पवार यांच्या तक्रारीवरून आरोपी बंडू चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना-

आरोपीने खून करून पलायन केले असून त्याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उप-निरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार चव्हाण, रविकांत हरकाळ, गजानन पोकळे यांचे पथक रवाना झाले आहे.

हेही वाचा- अँटिलिया प्रकरण: पाचवी मर्सिडीज गाडी 'एनआयए'ने केली जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.