हिंगोली - मला माहित आहे, तुझा नवरा शेतात गेला आहे म्हणूनच तर आलो आहे, असे म्हणून घरात शिरून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. भानुदास रुपाजी वामन (रा. मालसेलू) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, आरोपी माजी सरपंच तसेच खासगी डॉक्टर आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने 4 मार्च रोजी रात्री अकरा वाजता पीडितेच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. यानंतर आतून कडी लावून घेत दरवाजा बंद केला. तसेच वाईट उद्देशाने हात धरला. 'तुझा नवरा हा शेतात गेला असल्याची माहिती मला मिळाली. म्हणूनच तर मी आलो आहे', असे म्हणून जोरात पलंगावर लोटून देऊन महिलेचा विनयभंग केला. यावेळी पीडितेने आरडाओरड केली. यानंतर शेजाऱ्यांनी पीडितेच्या दारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी हा दरवाजा उघडून फरार झाला होता. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या विरोधात सासूची पोलिसांत तक्रार
याप्रकरणी, बिट जमादार नंदकिशोर मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.