हिंगोली - भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ते वैयक्तिक कामासाठी पंजाब येथे गेले होते. लक्षणे जाणवत असल्याने मुटकुळे यांनी जिल्हासामान्य रुग्णालयात अँटिजन तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार मुटकुळे यांनी केले आहे.
वैयक्तिक काम करून पंजाबहून हिंगोलीला परतल्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ची अँटिजन तपासणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुटकुळे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले आहे. मुटकुळे यांची प्रकृती चांगली असून काही ही घाबरण्याचे कारण नसल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.