हिंगोली : राज्यामध्ये एकूण 200 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या केवळ 5 जागा आणि महाविकास आघाडीच्या 12 जागा निवडून आल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संतोष बांगर हे मतदारांना मार्गदर्शन करत होते. दरम्यान त्यांनी मार्गदर्शन करत असताना कलवरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 उमेदवार आपलेच निवडून येतील. जर निवडून आले नाही, तर मी हा संतोष बांगर आपली मिशी काढेल, असे वक्तव्य केले होते. पुन्हा एक नवीन वाद ओढवून घेणारा हा आमदार संतोष बांगर यांचा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
केवळ पाच जागा : संतोष बांगर म्हणतात की, कळमनुरीमध्ये राष्ट्रवादी उरलेली शिवसेना काँगेस वंचित हे सर्व एकत्र आलेत, मात्र काहीही फरक पडणार नाही. आजही सांगतो विशेष म्हणजे या नागनाथाच्या समोर सांगतो की, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्या 17 पैकी 17 जागा निवडून येतील, अन त्या निवडुन आल्या नाही तर हा संतोष बांगर आपली मिशा काढेल, असे वक्तव्य केले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील झाला होता. मुळात बांगर म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या केवळ 5 च जागा निवडुन आल्या आहेत. त्यामुळे संतोष बांगर यांना सध्या चांगले ट्रोल केले जात आहे.
संतोष बांगरसाठी गिफ्ट : आमदार संतोष बांगर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना चांगले स्ट्रोल केले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रज्ञाताई पोळ यांनी संतोष बांगर यांची चांगलीच खिल्ली उडवली. त्यांनी संतोष बांगर यांच्यासाठी एक चांगलेच अनोखे गिफ्ट (शेविंग रेझर) मिशी काढण्यासाठी आणले आहे, ते त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवले. माझा हा लाडका दादूड्या नेहमीच असे काहीतरी आगळे वेगळे व्हिडिओ करून तर कधी मारहाण करून, चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रज्ञाताई पौळ त्यांनी सांगितले.
मिशी काढण्याकडे लागले जनतेचे लक्ष : मी जेव्हा हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गेले होते, तेव्हा, हा दादूड्या तिथून पळून गेला. एवढेच काय तर, औंढा नागनाथ मंदिरामध्ये गेले होते, तिथून देखील हाच दादूड्या पळाला. पुढे येण्याची अजिबात हिम्मत करत नसल्याचे प्रज्ञाताई पौळ यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आमदार संतोष बांगर यांनी त्यांची मिशी काढण्याची भाषा केल्याने ते आता चांगले चर्चेत आले आहेत. त्यांच्या जागा आता मुळात केवळ पाचच निवडून आल्याने ते मिशी कधी काढणार, याकडे आता संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.