हिंगोली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच या ना त्या MLA santosh Bangar slap manager in hingoli कारणाने चर्चेत राहतात. आता तर त्यांनी ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष घातले आहे. जिल्हाभरात बांधमक कामगारांना दिल्या जाणारे निकृष्ट दर्जाचे भोजन, त्यात खराब झालेल्या पोळ्या, बुरशी आलेला भात, वरण पाहून आमदार संतोष बांगर हे चांगलेच संतापले. बांगर यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन व्यवस्थापकाला विचारणा याबाबत विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने बांगर यांनी त्याच्या खानाखाली लगावली. याचा व्हिडिओ सोशल मोडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा Maharashtra assembly monsoon session सत्ताधाऱ्यांची उद्या कसोटी आज चहापान कार्यक्रम
भयंकर दृश्य पाहून बांगर संतापले जिल्ह्यामध्ये कामगार विभागाकडे नोंद असलेल्या कामगारांना विविध बांधकाम ठिकाणी मध्यान्ह भोजन दिले जाते. जवळपास 25 हजार पेक्षा अधिक कामगारांना हे भोजन पोहोचवले जाते. या भोजनाचा कंत्राट मुंबई येथील गुनीना कंपनीला देण्यात आले आहे. यातून कंपनीला एका थाळीला 67 रुपये दिले जातात. मेनूनुसार भोजन पुरवणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हे भोजन निकृष्ट दर्जाचे पुरविले जात होते. तशा तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. परंतु, याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. ही बाब आमदार संतोष बांगर यांच्या लक्षात येताच त्यांनी मध्यान्ह भोजन ठिकाण गाठले आणि तेथील भयंकर दृश्य पाहून चांगलेच संतापले.
व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली भोजनाची स्थिती पाहून बांगर यांनी थेट व्यवस्थाकाचे कार्यालय गाठले. त्यांना निकृष्ट भोजनासंदर्भात विचारणा केली. व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत होता. सांगण्यात येत असलेल्या मेनूनुसार आजचे भोजन केले नसल्याचे लक्षात आले. तरीही व्यवस्थापक ऐकण्यास तयार नसल्याने त्याच्या खानाखाली बांगर यांनी लगावली.
कंपनीच्या मालकाशी साधला दूरध्वनीवरून संपर्क भोजनाचा विदारक प्रकार बांगर यांनी कंपनीच्या मालकाला दूरध्वनीवरून सांगितला तर मालक देखील सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्याने त्यांचीही चांगलीच कानउघडणी केली. शासनाची योजना चांगल्या पद्धतीने राबवा, कामगारांच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल, असा इशारा देखील बांगर यांनी दिला.
कामगार अधिकाऱ्यांनाही सांगितला हा प्रकार कंपनीच्या मालकाशी बोलल्यानंतर बांगर यांनी हा प्रकार कामगार विभागाचे कामगार अधिकारी कराड यांच्या कानावर घातला. त्यांना यामध्ये लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. येथून पुढे हा निकृष्ट दर्जाच्या भोजनाचा प्रकार अजिबात खपवून घेणार नसल्याचे बांगर यांनी अधिकाऱ्याला सांगितले.
गावोगाव फिरून केले जात आहेत आधार कार्ड गोळा या मध्यान्ह भोजनासाठी कंपनीला एका थाळीसाठी 67 रुपये मिळतात. त्यामुळे कंपनीने गावोगावी याचे जाळे तयार केले आहे. त्या त्या गावातील महिला व पुरुषांचे आधार कार्ड गोळा करण्यासाठी एका व्यक्तीची निवड केली असून त्या व्यक्तीच्या माध्यमातून गावोगावी वाहनाद्वारे भोजन वाटप केले जात आहे. वास्तविक पाहता, हे भोजन बांधकाम कामगारांना वाटप करणे अपेक्षित असताना केवळ थाळीची संख्या वाढवण्यासाठी हा जालीम उपाय वापरला जात आहे.
हेही वाचा AC Local in Central Railway मध्य रेल्वेमध्ये अतिरिक्त दहा एसी लोकल वाढवल्या जाणार