ETV Bharat / state

MLA Santosh Bangar : ...अन्यथा रट्टे द्यायला लावेल, आमदार बांगर यांची पुन्हा एका शासकीय कर्मचाऱ्याला धमकी - MLA Santosh Bangar Threat

शेतकऱ्याने विद्युत पुरवठा खंडीत केल्याची व्यथा आमदार संतोष बांगर यांच्या जवळ मांडल्यानंतर आमदार बांगर यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या शासकीय कर्मचाऱ्याला फोन लावला. विद्युत पुरवठा तोडण्याचे कारण विचारले. आमदार बांगर यांनी कर्मचाऱ्याला दम देऊन बोलण्यास सुरुवात केल्याने कर्मचारी नरमला त्यातच जर विद्युत जोडणी केली नाही तर तुला रट्टे देयला लावीन, अशी धमकी ( MLA Santosh Bangar Threat on Goverment Employee ) दिली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 25, 2022, 7:31 PM IST

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या बोलण्याने आणि धमक्या ( MLA Santosh Bangar Threat ) देण्याने चर्चेत राहतात. आता पुन्हा एका कर्मचाऱ्याला शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने मारायला लावण्याची धमकी ( MLA Santosh Bangar Threat on Goverment Employee ) दिल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अजून या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नसला तरी आमदार बांगर यांच्या धमक्यांमुळे अधिकारी कर्मचारी चांगलेच धास्तावलेले आहेत.

आमदार संतोष बांगर यांची शासकीय कर्मचाऱ्याला धमकी

आमदार बांगर यांची धमकी - शेतकऱ्याने विद्युत पुरवठा खंडीत केल्याची व्यथा आमदार संतोष बांगर यांच्या जवळ मांडल्यानंतर आमदार बांगर यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या शासकीय कर्मचाऱ्याला फोन लावला. विद्युत पुरवठा तोडण्याचे कारण विचारले. आमदार बांगर यांनी कर्मचाऱ्याला दम देऊन बोलण्यास सुरुवात केल्याने कर्मचारी नरमला त्यातच जर विद्युत जोडणी केली नाही तर तुला रट्टे देयला लावीन, अशी धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार बांगर यांच्या गाडीच्या आवती भवती उभे असलेल्या शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये कैद केला.

शेतकऱ्याची विद्युत पुरवठा खंडीत केला - सध्या रबीचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस पिकाला पाणी देत आहेत. बऱ्याच भागामध्ये वीज मोटारी सुरू असल्याने अतिरिक्त लोड येऊन विद्युत पुरवठा कधी खंडित होत आहे तर कधी वीज बिलासाठी वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. अशाच परिस्थिती मध्ये ओंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी या भागातील वीज जोडणी तोडल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी ही बाब आमदार संतोष बांगर यांना सांगितली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.