हिंगोली- सर्वांचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी साहित्यासह कर्मचारी हे केंद्रावर रवाना झाले आहेत. उद्या 422 ग्रामपंचायतिची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून,निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
सर्वांचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 हजार 276 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 150 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, 5 लाख 57 हजार 356 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.2 लाख 91 हजार 869 पुरुष तर 2 लाख 65 हजार 487 स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 814 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी एकूण 1 हजार 276 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अशी आहे तालुका निहाय ग्रामपंचायतिची संख्या -
जिल्ह्यात एकूण 422 ग्रामपंचायतिची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात 78, कळमनुरी 94, सेनगाव 81, ओंढा ना.72, वसमत 97 या ग्रामपंचायतिचा समावेश आहे.