ETV Bharat / state

अंधश्रद्धेचा आणखी एक बळी; भानामती करण्याच्या संशयातून एकाची हत्या - शंकर साधू आलझेंडे हत्या

आरोपींनी शंकर आलझेंडे यांना शिवीगाळ करून 'तू करणी, कवटाळ, भानामती, जादूटोणा करतोस' असे म्हणत जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवले. गावापासून काही अंतरावर नेवून बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली.

hing
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 13, 2019, 11:56 PM IST

हिंगोली - भानामती केल्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पारडा येथे घडली आहे. याप्रकरणी, बासंबा पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर साधू आलझेंडे (वय 55), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, विकास गोविंदपुरे, संतोष तोरकड आणि सिद्धेश्वर तोरकड अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी शंकर यांना शिवीगाळ करून 'तू करणी, कवटाळ, भानामती, जादूटोणा करतोस' असे म्हणत जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवले. गावापासून काही अंतरावर नेवून बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळतात बासंबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. संतोष मारोती आलझेंडे यांच्या तक्रीरीनंतर तीनही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जादुटोण्याच्या संशयावरुन ओरिसामध्ये सहा जणाचे काढले दात, मानवी विष्ठाही घातली खाऊ

पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी आर. वैजणे, सपोनि मल्लपिल्लु, मगन पवार, प्रवीण राठोड यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास गोविंदपुरे आणि संतोष तोरकड या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेला ऑटो जप्त करण्यात आला असून, फरार ऑटोचालक सिद्धेश्वर तोरकड याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वैजणे करत आहेत.

Intro:
हिंगोली- दिवसेंदिवस विज्ञानाचा प्रभाव वाढत असला तरीही डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत अजूनही उतरलेले नाही. भूत सवार झालेल्या काही जणांनी अशाच एका जनाचा भानामती करण्याच्या संशयातून खून केल्याची घटना हिंगोली तालुक्यातील पारडा येथे घडलीय. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात संतोष मारोती आलझेंडे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Body:शंकर साधू आलझेंडे(55) अस मयताच नाव आहे. तर नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे, संतोष किसन अप्पा तोरकड बाळू उर्फ सिद्धेश्वर रामा तोरकड अशी आरोपीची नाव आहेत. आरोपींनी मयत शंकर याला शिवीगाळ करून 'तू करणी, कवटाळ, भानामती, जादूटोणा करतोस' असे म्हणत जबरदस्तीने त्यात ऑटो मध्ये कोंबून गावापासून काही अंतरावर नेले. बेदम मारहाण करत त्याचा खुनच करून टाकला. मयत अवस्थेत पडलेल्या शंकर ची माहिती कळतात घटनास्थळी बासंबा पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनेचा पंचनामा केला अन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.Conclusion: या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेवरून अंधश्रद्धा ही अनेकांच्या डोक्यामध्ये कायम असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. वैजणे, सपोनि राजेश मल्लपिल्लु,मगण पवार, प्रवीण राठोड यांनी तपासाची चक्रे गतिमान फिरवून पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे व संतोष किसनअप्पा तोरकड यास बेड्या ठोकल्या. तर गुन्ह्यात वापरण्यात आलेला आटो जप्त केला असून, फरार ऑटोचालक बाळू उर्फ सिद्धेश्वर तोरकड याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वजने हे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.