ETV Bharat / state

हिंगोलीत 50 लाखांचे सागवान जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - 50 लाखांचे सागवान जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील पेडगाव, वडगाव शिवारात छापा मारून 50 लाख रुपयांचे सागवान जप्त केले. या कारवाईने लाकूड माफियाचे धाबे दणाणले आहेत.

hingoli
हिंगोलीत 50 लाखांचे सागवान जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:00 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात अजूनही चोरीछुपे सागवान लाकडाची सर्रासपणे कापली जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील पेडगाव, वडगाव शिवारात छापा मारून 50 लाख रुपयांचे सागवान जप्त केले. या कारवाईने लाकूड माफियाचे धाबे दणाणले आहेत.

आखाडा बाळापूर परिसरात चोरून सागवान घेऊन जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी त्यांच्या पथकासह आखाडा बाळापूर परिसरात धाव घेतली. त्या ठिकाणी ट्रक चालक एका झाडीमध्ये ट्रक नेऊन लपवून ठेवत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे लाकूड कंपन्यांना संदर्भात काही परवाना किंवा लाकडावर कोणता स्टॅम्प दिसून आला नाही.

हेही वाचा - हिंगोलीत विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू; नुकतीच दिली होती बारावीची परीक्षा

ट्रकच्या चालकाकडे याबाबत विचारपूस केली असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चालकाला ताब्यात घेऊन सर्व विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेत पोलिसांनी ट्रक बाळापूर पोलीस ठाण्यात लावला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया पोलिसांकडून सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.