ETV Bharat / state

महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई - महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ

देशभर ओळख असलेल्या नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या दिवशी याठिकाणी जास्तच भाविक गर्दी करतात. औंढा नागनाथ मंदिराचा इतिहास तसा फार जुना आहे. हे मंदिर पाषाण दगडापासून बनवलेले असून, प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आलेले आहे. मात्र, मंदिर निश्चित कोणी बांधले हे सांगणे शक्य नाही.

शिवरात्रीला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई

author img

By

Published : Feb 21, 2020, 3:39 AM IST

हिंगोली - देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथ ओळखलं जातं. औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महाशिवरात्रनिमित्त लाखोंहून अधिक भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी आले आहेत. देवस्थान परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली आहे.

महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई

देशभर ओळख असलेल्या नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या दिवशी याठिकाणी जास्तच भाविक गर्दी करतात. औंढा नागनाथ मंदिराचा इतिहास तसा फार जुना आहे. हे मंदिर पाषाण दगडापासून बनवलेले असून, प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आलेले आहे. मात्र, मंदिर निश्चित कोणी बांधले हे सांगणे शक्य नाही.

श्रावण मास आणि महाशिवरात्रीला लाखो भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात. दरवर्षी येथे यात्राही भरते. औंढा नागनाथ पौराणिक मंदिर आहे. मंदिरात आलेली पिंड ही स्वयंभू प्रगट झालेली आहे. तसेच शिव आणि विष्णू या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यास असल्याने या मंदिरात बेलही चालतो आणि तुळसही चालते.

मंदिराच्या बांधकामाविषयी अनेक आख्यायिका आहेत. हस्तीनापुर येथून 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आलेल्या पांडवांपैकी उद्धिष्ट राजाने हे मंदिर बांधल्याचं सांगण्यात येतं. द्वापार युगामध्ये मंदिराची स्थापना झाल्याचेही सांगितले जाते. हा कालावधी साधारणपणे 5 हजार वर्षापूर्वीचा मानला जातो. तर शिवपुजक राक्षसांने एका अखंड दगडातून तसेच एकाच रात्रीतून हे मंदिर बांधले असल्याचीही आख्यायिका आहे.

इतिहासकारांच्या मतानुसार, हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेतील असून हे यादव काळात तेराव्या शतकात बांधल गेल होतं. नागेश्वराचे हे मंदिर स्थापनेचा आकर्षक अविष्कार आहे. या मंदिराला वेरूळ अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा वाकाटक आणि राजकुट घराण्याशी त्या कालखंडाशी जोडला, परंतु शिल्पक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचं काम हे हेमांडपंती असल्याचं जाणवतं. त्यामुळे मंदिर हे निश्चित कोणी बांधले हे सांगणं शक्य नाही.

नागनाथ मंदिर सुमारे 7500 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. मंदिराच्या पूर्वेला हरिहर नावाचा तलाव आहे. हा तलावही पुरातन आहे. मंदिराचा वरचा पांढरा भाग हा इंदोरची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 17 व्या शतकात जीर्णोद्धार केलेला आहे. तर खालचा असलेला काळा पाषाण भाग तो मात्र, पूर्णपणे द्वापरयुगातील आहे.

मंदिराच्या चहूबाजूला देव-देवतांच्या मूर्ती एका अखंड विशिष्ट दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. नागनाथाला दारुकावणे म्हणून संबोधलं जाते. येथे येणाऱ्या भाविकांना दररोज संस्थांकडून वीस रुपयांमध्ये पोटभर जेवण दिलं जातं. महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रथोत्सव देखील मोठ्या उत्साहात पार पडत असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.