ETV Bharat / state

आर्थिक विवंचनेतून वधू पित्याची आत्महत्या.. पुढील महिन्यात होता लेकीचा विवाह

author img

By

Published : Jan 29, 2020, 11:36 AM IST

आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई पाठोपाठ वडील देखील मृत पावल्याने कु़टुंबावर शोककळा पसरली आहे. पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचा विवाह होणार होता.

hingoli suicide news
आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हिंगोली- वाढत्या महागाईसह आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटे साडेसहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आई पाठोपाठ वडील देखील मृत पावल्याने कु़टुंबावर शोककळा पसरली आहे. पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचा विवाह होणार होता. धोंडिबा राजाराम करंडे(वय-46) असे आत्महत्या करणाऱ्या वधूपित्याचे नाव आहे.

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदर्निर्वाह करत होते. त्यांना एकूण चार आपत्ये असून सोळा वर्षांपूर्वी दीर्घ आजराने पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला होता. अन्य एकीचा विवाह पुढील महिन्यात होणार होता. मात्र, आर्थिक मंदीमुळे त्यांच्या कामावर गदा आली. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली.

या मुलीच्या विवाहासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:
हिंगोली- दिवसेंदिवस वाढती महागाई, अन आर्थिक मंदी मुळे रोजगार मिळत नसल्याने, हतबल झालेल्या वधू पित्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेसहा वाजता उगडकीस आलीय. आता आई पाठोपाठ वडील ही गेल्याने चारही मूल पोरकी झाली आहेत. तर पुढील महिन्यात मुलीचा विवाह ठरला होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Body:धोंडिबा राजाराम करंडे(46) रा. भोईपुरा हिंगोली अस मयताच नाव आहे. करंडे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते रोज मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्याना एकूण चार मूल असून, सोळा वर्षांपूर्वी दीर्घ अजराने पत्नीचे निधन झाले. तेव्हा पासून धोंडिबा यांच्यावरच घराची जबाबदारी पडली होती. रोजनदारी करून ते घराचा संसार चालवत अशातच त्यानी आपल्या मुलीचा विवाह केला तर आता एका मुलीचा विवाह जुळला होता. मात्र आर्थिक मंदी मुळे कामावर ही गदा अली. Conclusion:वाढत्या महागाई मुळे मुलीचा विवाहाचा खर्च नेमका कसा करायचा याच विवंचनेत ते सापडले होते. ते नियमित आपल्या मुलीच्या विवाहाच्या खर्चाचा विचार करत असत, तसेच ते कुणाला काही बोलत नसल्याचे नातेवाईक सांगत होते. आता जो शेवटचा आधार होता तो ही निघून गेल्याने मुलं आता पूर्णपणे पोरकी झाली आहेत. तर विवाह जुळलेल्या मुलीच्या विवाहासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास निश्चितच एका निराधार मुलीचा संसार जुळण्यास मदत होईल.

या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.