ETV Bharat / state

पशुबळी ऐवजी पुरी-भाजीचे वाटप, पशुहत्या रोखण्यासाठी कोथळजकरांचा पुढाकार - hingoli

येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून बोकडाचा बळी दिली जातो. त्यामुळे परिसरात रक्ताचे पाट वाहतात. मोठ्या प्रमाणात रक्त साचल्याने आसपास दुर्गंधी पसरते. तसेच, घाण तयार होते. या घाणीमुळे गावात अनेक आजाराची लागण झाल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. रक्तामुळे पसरणारी दुर्गंधी अनेक दिवस जात नाही.

कोथळज येथील गैबु पिर देवस्थानाला पशुबळी देण्याची प्रथा आहे
author img

By

Published : Mar 30, 2019, 9:59 AM IST

हिंगोली - देवस्थानांना पशुबळी देण्याची परंपरा महाराष्ट्रात नवीन नाही. पण, आता लोक जागृत होत असून अशा प्रकारांना विरोध करू लागले आहेत. जिल्ह्यातील कोथळज गावातील नागरिकांनी गावात होणाऱ्या पशूहत्येला विरोध केला आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुरी-भाजीचा प्रसाद वाटण्याचा पर्याय त्यांनी शोधला आहे. भाविकांकडूनही गावकऱ्यांच्या या उपक्रमाला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे.

पशुहत्येला विरोध करुन गावकऱ्यांनी पुरी भाजीचा प्रसाद सुरू केला आहे

कोथळज येथे गैबू पिर हे देवस्थान आहे. सर्वधर्मीय भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी संदल हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. संदलच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची प्रथा ३ पिढ्यांपासून चालू आहे. लोकांची श्रद्धा असल्याने ही प्रथा वर्षानुवर्षे चालुच होती. पण, याचे दुष्परिणाम गावकऱ्यांना जाणवू लागल्याने त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली.

येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून बोकडाचा बळी दिली जातो. त्यामुळे परिसरात रक्ताचे पाट वाहतात. मोठ्या प्रमाणात रक्त साचल्याने आसपास दुर्गंधी पसरते. तसेच, घाण तयार होते. या घाणीमुळे गावात अनेक आजाराची लागण झाल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. रक्तामुळे पसरणारी दुर्गंधी अनेक दिवस जात नाही. हे बळी पाहिल्याने लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे अशा बळींना विरोध करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

पशुबळीला पर्याय म्हणून गावकऱ्यांना भाविकांसाठी पुरी भाजीचा प्रसाद वाटप केला. याला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पण, अजूनही लोकांचा जुना समज जात नाही. काही लोक शेजारच्या शेतात जाऊन बळी देतात. त्यामुळे ही प्रथा समूळ कशी नष्ट करायची ? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे. पशुहत्या कायम बंद करण्याचा प्रयत्न करु, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. महिला भाविक या बंदीचे स्वागत करत आहेत.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे असलेले गैबु पीर देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर वर्षी संदल मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. संदल उत्साहात करण्याची ही तिसरी पिढी आहे. सुरुवाती पासूनच या ठिकाणी पशु हत्याची परंपरा चालत आली आहे. मात्र येथील प्रतिष्ठित नागरिकांनी ही पशुहत्येची परंपरा बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्याला दोन वर्षांपासून यशही आले आहे. आज घडीला या ठिकाणी पशु हत्येला स्पष्ट नकार दर्शविण्यात आला असून भाजी पुरीचा महाप्रसाद वाटप केला जातो.

Body:कोथळज हे दोन ते अडीच हजार लोक संख्येच गाव आहे. गावाच्या अगदी मधोमध गैबु पीर आहे. ठिकाणी गेल्या तीन पिढ्या पासून संदल उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे एके काळी या ठिकाणी दर संदल ला पीर परिसरात बकरे बळी देण्यासाठी जणू काय स्पर्धाच लागत होती. बकरे घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बकऱ्याच्या बळीने रक्ताचे पाट वाहत होते. तर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील सुटत होती. ही दुर्गंधी कित्येक काही ही केल्या जात नव्हती. या दुर्गंधी मुळे आजाराचे तर प्रमाणात वाढ होतच होती. त्याहूनही भयंकर म्हणजे पीर परिसरात दिल्या जाणाऱ्या बकरा बळी मुळे गावातील बालकांवर विपरीत परिणाम होत होता. त्यामुळेच येथील काही प्रतिष्ठित नागरिकानी या पशु बळीला दोन वर्षांपासून बगल दिली आहे. पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्रास ही झाला काहींना बकरा बळीची सवय झाली होती. त्यामुळे ते याला विरोध करू देत नव्हते. तर या बळीचा त्रास होणाऱ्या ना हे पाहवत नव्हते. त्यामुळे त्यानी या बळीला विरोध केला.

Conclusion:त्याला यशही आले. मात्र आजूनही जुन्या विचारांच्या भाविकांच्या डोक्यातून अंधश्रद्धा निघालेली नाही. ते या ठिकाणी बळी देण्यासाठी बकरा आणतात तर त्याला प्रतिष्ठित नागरिक विरोध करतात. त्यामुळे या ठिकाणी बळी न देता शेतात जाऊन बळी देणाऱ्यांची संख्या आता दिसून येत आहे. ती देखील बंद करण्याची तयारी असल्याचे नागरिक सांगत आहेत. पशु हत्येला गावात कायम बंदी घालण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तर पशु हत्या बंदी केल्याने महिला प्रवाशीही समाधान व्यक्त करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.