ETV Bharat / state

पश्चिम बंगाल डॉक्टर मारहाण प्रकरण : इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने हिंगोलीत डॉक्टरांचा संप

जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. मात्र, बंदचा फटका बऱ्याच रुग्णाना जाणवला आहे.

हिंगोली
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:56 AM IST

हिंगोली - पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने बंद पुकारण्यात आला. त्यालाच पाठिंबा म्हणून हिंगोलीतही असोसिएशनच्यावतीने बंद पुकारून डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध केला. यावेळी डॉक्टरांनी पोलीस प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन दिले. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. मात्र, बंदचा फटका बऱ्याच रुग्णाना जाणवला आहे.

पश्चिम बंगाल डॉक्टर मारहाण प्रकरण : इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने हिंगोलीत डॉक्टरांचा संप

सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने संप पुकारल्यामुळे संपूर्ण खासगी रुग्णालय बंद होते, तर डॉक्टरांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दिवसभर खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा यावेळी आधार घ्यावा लागला.

सोमवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही खासगी डॉक्टर सेवा देणार नसल्याचे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, अत्यावश्यक सुविधा आणि आपत्कालीन सेवा या काळात सुरूच ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, आज संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने बंद पुकारला आहे. त्यालाच पाठिंबा म्हणून हिंगोलीतही याच असोसिएशनच्यावतीने बंद पुकारून डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध करत डॉक्टराने पोलीस प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन दिले.तर जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या वतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. मात्र बंदचा फटका बऱ्याच रुग्णाना जाणवला.

Body:आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने संप पुकारल्यामुळे संपूर्ण खाजगी रुग्णालय बंद होते. तर डॉक्टराने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरण आंदोलन केले. आज दिवसभर खाजगी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे मात्र रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली त्यामुळे बऱ्याच रुग्णांना शासकीय रुग्णालय जवळ करत उपचार करून घेण्यासाठी प्रयत्न केले. आज आज दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही खाजगी डॉक्टर सेवा देणार नसल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. मात्र अत्यावश्यक सुविधा आणि आपत्कालीन सेवा या काळात सुरूच ठेवण्यात आल्याचे डॉक्टर सांगत होते.

Conclusion:हा संप 18 तास सुरू राहणार असून, आयएमएच्या डॉक्टरांनी डॉक्टरावर होणारे हल्ले बंद करण्याची मागणी करीत हिंसाचाराविरुद्ध केंद्रीय कायदा करण्याची मागणी डॉक्टराने केली. ज्या रुग्णानी कधी सामान्य रुग्णालयाची पायरी ही चढलेली नव्हती, आशा रुग्णांनी मात्र आज उपचारासाठी सामान्य रुग्णालयाचा आधार घेतला. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहावयास मिळाली. डॉक्टरांचे धरणे चे व्हिज्युअल व्हिज्युअल ftp केले आहेत. प्लिज बातमी मध्ये वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.