ETV Bharat / state

Banana Grower : अवकाळीने केळी केली आडवी; हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं स्वप्न क्षनात भंगले - Tehsildar Arvind Bolange

वसमत तालुक्यातील गिरगाव कुरुंदा यासह आदी भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने केळीचे उत्पादन सर्वाधिक जास्त घेतले जाते. यातून लाखो रुपयाचा नफा देखील मिळतो. परंतु, यंदाही पहिल्याच पावसामुळे ( heavy unseasonal rains in hingoli ) केळीचे पीक हे आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ( Huge losses to banana growers ) आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी प्रशासन स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे ( Tehsildar Arvind Bolange ) यांनी दिली.

heavy unseasonal rains in hingoli
अवकाळीने केळी केली आडवी
author img

By

Published : Jun 9, 2022, 3:16 PM IST

Updated : Jun 9, 2022, 3:30 PM IST

हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा गिरगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी ( heavy unseasonal rains in hingoli ) लावली. या पावसात उभी असलेली केळी क्षणात आडवी पडल्याने या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणात भंगले ( Huge losses to banana growers ) आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी प्रशासन स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे ( Tehsildar Arvind Bolange ) यांनी दिली.

प्रतिक्रिया

केळी झाली आडवी - वसमत तालुक्यातील गिरगाव कुरुंदा यासह आदी भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने केळीचे उत्पादन सर्वाधिक जास्त घेतले जाते. यातून लाखो रुपयाचा नफा देखील मिळतो. परंतु, यंदाही पहिल्याच पावसामुळे केळीचे पीक हे आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरंतर लहानाचे मोठे केळीचे पीक करताना शेतकऱ्यांच्या अक्षरशा नाकीनऊ येतात. मात्र, मान्सून पूर्व हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले केळीचे पीक हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. याच केळीच्या पिकावर शेतकऱ्यांनी भविष्यातील स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली होती. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या नजरेतून केळी झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरल्या गत झाले आहे.

400 हेक्टरवर केळीचे नुकसान - वसमत आणि कुरुंदा या दोन गावांमध्ये केळीचा पेरा हा बाराशे हेक्‍टरवर आहे मात्र प्रत्यक्षात 400 ते 500 हेक्‍टरवर पहिल्याच पावसामध्ये केळीचे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमानुसार 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास सदरील शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते, त्यानुसार 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे., तरीदेखील कृषी विभागाचे कर्मचारी तसेच कृषी सहाय्यक तलाठी हे नुकसानीची पाहणी करीत आहेत, आता एकूण नुकसान नेमके झाले किती? ते अजून तरी कळले नाही. मात्र नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.

खरीप पेरणीसाठी आशा पल्लवित - पहिल्याच पावसाने केळी पिकाचे नुकसान झालेले असले, तरीही या भागात झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Sangli Crime News : नकली नोटा खपवणारी टोळी गजाआड; तिघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : Jun 9, 2022, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.