ETV Bharat / state

हिंगोलीतील महिलेचा नांदेडमध्ये कोरोनाने मृत्यू , कोरोनाचा चौथा बळी - हिंगोली कोरोना बातमी

हिंगोली जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित महिलेचा नांदेड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हा चौथा बळी असून चारही मृत्यू हे परजिल्ह्यात झाले आहेत.

hingoli hospital
हिंगोली रुग्णालय
author img

By

Published : Jul 15, 2020, 12:13 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील एका कोरोनाबधित महिलेचा नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हा कोरोनाचा चौथा बळी असून, यापूर्वी अकोला, नांदेड, हैदराबाद येथे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.

हिंगोली शहरातील बागवानपुरा मंगळवारा भागातील एका पंचवीस वर्षीय महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब व श्वसनाच्या त्रासाने आजारी असल्याने या महिलेवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. अशातच महिला कोरोणाची लागण झाली तिच्यावर उपचार सुरू असताना 13 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा हा चौथा बळी असून यापूर्वी सेनगाव तालुक्यातील केंद्र खुर्द येथील एका 21 वर्षीय तरुणीचा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 जून रोजी मृत्यू झाला. याही तरूणीला मधुमेहाचा आजार झाला होता. तसेच कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील 70 वर्षीय व्यक्तीला फुप्फुसाचा आजार असल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानाही कोरोनाची लागण झाली व 28 जून रोजी त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वसमत येथील एका व्यक्तीचा 10 जूनला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

आतापर्यंत चार जणांचे कोरोनाने बळी घेतलेले आहेत. हे मृत्यू परजिल्ह्यात झाले असल्याने, त्यांची नोंद ही त्या-त्या जिल्ह्यातच करण्यात आलेली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सुदैवाने अजून तरी एका ही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. हिंगोली जिल्हा कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 361 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 287 रुग्ण हे बरे झाले असून, 74 रुग्णावर विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरू आहेत. परंतु आता नांदेड येथे मृत्यू झालेल्या महिलेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.