ETV Bharat / state

..अखेर त्या झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा! - हिंगोली युवा सेना घोरदरी शाळा

सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावापासून मुंगसाजी नगर हे अवघे चार ते पाच किलोमीटर आहे. मात्र या शाळेत जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा कोणत्या दिव्याहून कमी नाही. काट्याकुट्यातून, शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यातून मार्ग काढत ही शाळा गाठावी लागते. मात्र अशा भयंकर परिस्थितीत अविरतपणे येथील दोन शिक्षक या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात.

Hingoli Yuva Sena helps to build school building
युवा सेनेच्या मदतीने झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!
author img

By

Published : Jan 11, 2020, 2:59 AM IST

हिंगोली - आजही बऱ्याच ग्रामीण भागांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठी दुरवस्था आहे. हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यात असलेल्या मुंगसाजी नगर येथील शाळेची गत मात्र वाईटाहून वाईट आहे. ही वस्ती शाळा चक्क एका झोपडीत भरते. ही खळबळजनक बाब विविध माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

युवा सेनेच्या मदतीने झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!

शाळेत जाण्यासाठी करावा लागतो खडतर प्रवास..

सेनगाव तालुक्यतील घोरदरी गावापासून मुंगसाजी नगर हे अवघे चार ते पाच किलोमीटर आहे. मात्र या शाळेत जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा कोणत्या दिव्याहून कमी नाही. काट्याकुट्यातून, शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यातून मार्ग काढत ही शाळा गाठावी लागते. मात्र अशा भयंकर परिस्थितीत अविरतपणे येथील दोन शिक्षक या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात.

युवासेनेने दिलेले आश्वासन पाळले..

या शाळेला युवासेना प्रमुख यांनी कार्यकर्त्यांसह मुंगसाजी नगर येथे पायपीट करत जाऊन भेट दिली. यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख संदेश देशमुख यांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना उबदार कपडे दिले होते. त्याच वेळी त्यांनी या ठिकाणी वर्ग खोली उभारून देण्यासाठी निश्चित सेना प्रयत्न करेल असे अश्वासन दिले होते. अन् तेच आश्वासन पूर्ण करत, युवा सेना प्रमुख दिलीप घुगे यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले.

शिक्षण विभागही करत आहे इमारत उभारण्यासाठी प्रयत्न..

जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागदेखील या चिमुकल्यांना त्यांच्या हक्काची शाळा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, येथील जमीन वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे, त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागत आहे.

दरम्यान, कोणत्या ना कोणत्या प्रकारे या चिमुकल्यांसाठी मदतीचा हात पुढे येत असल्यामुळे, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच माध्यमांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी माध्यमांचेही आभार मानले आहेत. युवा सेनेने केलेल्या मदतीमुळे, झोपडीत शिक्षण घेणारे हे चिमुकले काही दिवसांमध्येच आपल्या हक्काच्या इमारतीमध्ये शिक्षण घेतील.

हेही वाचा : #CAA #NRC आणि #NPR विरोधात २४ जानेवारीला महारॅली; शरद पवार करणार नेतृत्व

Intro:

हिंगोली- झोडीत शिक्षण घेणाऱ्या त्या चाणाक्ष अन हुशार चिमुकल्यांच्या बातम्या विविध माध्यमावर प्रकाशित होताच, सेना त्यांच्या मदतीसाठी सरसावली असून, आज युवा सेना जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यानी मुंगसाजी नगर येथे कार्यकर्त्यांसह धाव घेतलीय. अन तेथील चिमुकल्यांशी सवांद साधत त्याना त्यांचे तिनही ऋतू पासून सुटका करण्यासाठी हक्काची वर्ग खोली उभारून देण्यासाठी युवा सेना प्रमुख दिलीप घुगे यांनी उद्घाटन केले. येत्या दहा ते पंधरा दिवसात या ठिकाणी वर्गखोली उभी राहुन चिमुकल्यांची झोपडीपासून सुटका होणार आहे. यामुळेच चिमुकल्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले.

Body:आजही बऱ्याच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठी दुरवस्था आहे. मात्र मुंगसाजी नगर येथील वस्ती शाळा एका झोपडीत भरतेय, अन ही खळबळजनक बाब विविध माध्यमाने प्रसिद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी कधी नव्हे तो अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. विशेष म्हणजे घोरदरी पासून मुंगसाजी नगर हे चार ते पाच किमी अंतर आहे. मात्र हा एवढा भयंकर प्रवास आहे, शेताच्या कड्याला असलेल्या ओढ्यातून मार्ग काढत ही शाळा गाठावी लागतेय. रस्ता पाहून तर अंगावर शहारे उभे राहतात. मात्र अशा ही भयंकर परिस्थितीत अविरत पणे येथील दोन शिक्षक या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. पावसाळ्यात तर काय व्यथा असेल याचा विचार न करणेच बरे. आज युवासेना प्रमुख यांनी कार्यकर्त्यांसह मुंगसाजी नगर येथे पायपीट करीत धाव घेतली. या पूर्वी शिवसेना तालुका प्रमुख संदेश देशमुख यांनी देखील अशीच पायपीट करीत विध्यार्थ्यांची भेट घेतली अन त्याना उबदार कपडे दिले. त्याच वेळी या ठिकाणी वर्ग खोली उभारून देण्यासाठी निश्चित सेना प्रयत्न करेल असे अश्वासन दिले होते. अन तेच अश्वासन युवा सेना प्रमुख दिलीप घुगे यांनी पूर्ण करून, खोलीच्या बांधकामाचे उद्घाटनच केले. त्यामुळे आता निश्चितच येथील चिमुकल्यांची झोडीतून सुटका होण्यास मदत मिळणार असल्याने, माध्यमानी हा प्रश्न लावून धरल्या मुळे, पालकांनी माध्यमांसह मदतिसाठी धावून आलेल्या सेनेच्या कार्यकर्त्याचे ही अभार मानले. तर दुसरीकडे शिक्षण विभाग ही या चिमुकल्याना त्यांच्या हक्काची शाळेची ईमारत देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ही माहिती समोर आलीय. मात्र या ठिकाणी हक्काची जमीन नसल्याने, अडचणी निर्माण होत आहेत. Conclusion:येथे असलेली वन विभागाच्या जमीन त्यावर इमारत उभारून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अधून मधून सुरू असलेली मदत पाहून येथील युवा अन पालक वर्ग चांगलाच भरातून जात आहे. जागेचे मोजमाप केले असून, घुगे यांनी येथील बांधकामाची जबाबदारी देखील कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यामुळे आता काही दिवसच चिमुकले झोपडीत धडे गिरवतील हे मात्र तेव्हडचं सत्य. येथील परिस्थिती खरोखरच भयंकर आहे. याठिकाणी वास्तव्यास असलेले ग्रामस्थ कशा प्रकारचे जीवन जगत असावेत? हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.