ETV Bharat / state

VIDEO : हिंगोलीत वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ - Traffic police

शहर वाहतूक शाखेत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यामुळे वाहतुकीला शिस्त लागत आहे. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त झाल्याचे दिसून येत आहे.

असभ्य वर्तन करताना पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Mar 17, 2019, 9:44 AM IST

हिंगोली - शहर वाहतूक शाखेत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यामुळे वाहतुकीला शिस्त लागत आहे. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस कर्मचारी वाहन चालकांना कारवाई करताना चक्क शिव्या देत आहेत. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असभ्य वर्तन करताना पोलीस कर्मचारी

हिंगोली येथील वाहतूक शाखेत पो.नि चिंचोळकर रुजू होताच बेशिस्त चालकांवर कारवाईचे प्रमाण वाढले. तसेच यातून लाखो रुपयांचा दंडही वसूल झाला आहे. मागील ६ मार्चपासून तर वाहन चालकांना पोलिसांनी भांबावून सोडले आहे. परंतु, ही कारवाई करताना पोलीस आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरुन चालले आहेत. एका दुचाकी चालकाने उलट प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर द्यायचे सोडुन या पोलीसाने त्याला शिवीगाळ केली. दुचाकीस्वाराच्या खिशाला असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्वतःच्या कल्पनेतून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याचे संरक्षण म्हणून, वर्दीवर कॅमेरा बसवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. कॅमेरा वर्दीवर बसण्यापुर्वीच प्रवाशांचे गुप्त कॅमेरे पोलिसांचा अभद्र चेहरा लोकांसमोर आणत आहेत. प्रवाशांच्या कॅमेऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा उघडा पाडला आहे. या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी चर्चेत आले आहेत.

नव्याने रुजू झालेले पो. नि चिंचोळकर यांनी वाहतुकीला शिस्त लावतानाच कर्मचाऱ्यांना देखील शिस्त लावण्याची गरज आहे. केवळ कारवाईचा आकडा आणि दंड वाढवून उपयोग होणार नाही. आता पोलीस अधीक्षक योगेश कुमार अन पो.नि चिंचोळकर अशा कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:हिंगोली येथील वाहतूक शाखेत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळ्कर यांच्या मुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागली खरे मात्र वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांची शिस्त बिघडलीय. कर्मचारी चक्क प्रवाशांसोबत कमरेखालची भाषा वापरत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देखील चर्चेत आलेत. कमरेखालची भाषा वापरल्याचा व्हिडीओच व्हायरल झाल्याने, भाषा वापरणाऱ्यावर काय बडगा उगरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. मात्र खांद्यावर कॅमेरा बसण्या अगोदर प्रवाशांच्याच कॅमेरा गळ्यात आलाय.

Body:हिंगोली येथील वाहतूक शाखेत पोनि चिंचोळकर रुजू होताच कारवाईचे आकडे तर वाढलेत त्याहूनही आनंदाची बाब म्हणजे लाखो रुपयांचा दंड वसूल झालाय. शहरातील गल्लीबोळात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकाकडून, दंड वसूल करीत आहेत. मागील ६ मार्च पासून तर वाहन चालकांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने एवढे भांबावून सोडले आहे. त्यामुळे कंटाळून बऱ्याच वाहन चालकांनी वाहन घरी उभे करून पायी चालणे सुरू केले आहे. तर चार चाकी वाले दोन चाकीवर येऊन ठेपले आहेत. तसेच चिंचोळकर यांच्या मुळे वाहतुकीला शिस्त लागली, तसेच त्यांच्या कामाची पोहच पावती म्हणून की काय, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्वतःच्या कल्पनेतून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याचे संरक्षण म्हणून, वर्दीवर कॅमेरा ही दिलाय. मात्र अजून कॅमेरा वर्दीवर बसलाही नाही.यात तर प्रवाशांचा आवाज, व्हिडीओ रेकॉर्ड केला जाणार आहे. मात्र कॅमेरा वर्दीवर बसण्यापुर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क प्रवाशालाच कमरेखालची भाषा वापरली. अन ती भाषा प्रवाशाने कॅमेरामध्येही कैद केली. त्यामुळे आता प्रशासन त्या कर्मचऱ्यावर काय कारवाईचा बडगा उगरणार हा देखील संशोधनाचाच विषय राहणार आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी दिलेल्या कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करून न्यायालया पर्यन्त देखील पुरावा म्हणून वापरला जाणार आहे. मात्र आज प्रवाशांचाच कॅमेरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळ्यात पडलाय.या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात वाहतूक शाखेचे ही पोलीस कर्मचारी चर्चेला आलेत.

Conclusion:त्यामुळे नव्याने रुजू झालेले पोनि चिंचोळकर यांना हिंगोली शहरातील वाहतुकीला शिस्त लावत लावत कर्मचऱ्याना देखील शिस्त लावण्याची गरज आहे. केवळ कारवाईचा आकडा अन दंड वाढवून उपयोग होणार नाही. प्रवाशी हीच सेवा म्हणून राहावे लागणार आहे. आता पोलीस अधीक्षक योगेश कुमार अन पोनि ओंकांत चिंचोळकर कर्मचाऱ्यावर कोणती मेहरबानी दाखवितात या कडे सर्वांचे लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वीच तर एका पोलीस अधिकाऱ्याने लाचलुचपत कार्यालयातून धूम ठोकली होती. ती आठवण जाते न जाते तोच आता वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या कमरेखालच्या शिवीगाळीने पुन्हा उजाळा आला आहे.

व्हिडीओ वरील sulug नेमणे ftp केले आहेत

कमरेखालची भाषा आहे. कृपया काळजी पूर्वक कट करून बातमीत वापरावा.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.