ETV Bharat / state

Lockdown : ..अन् हिंगोलीत 'वर्दी'तली माणुसकी झाली जागी; मोकाट गुरांची भूक क्षमवली - हिंगोली पोलीस

लॉकडाऊनमुळे सर्वच परिस्थिती विदारक बनत चालली आहे. मोकाट गुरांच्या चाऱ्याची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांतील माणुसकी जागी झाली अन त्यानी चारा खरेदी करून भुकेने सैरा-वैरा भटकत असलेल्या गुरांची भूक क्षमवली.

Hingoli traffic police provided fodder for the animals
हिंगोलीत 'वर्दी'तली माणुसकी झाली जागी; मोकाट गुरांची भूक क्षमवली
author img

By

Published : Apr 26, 2020, 1:08 PM IST

हिंगोली - कोरोनामुळे सर्वच परिस्थिती विदारक बनत चालली आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरात बसले आहेत. दुकानेदेखील बंद असल्याने हिंगोलीत मोकाट गुरांची चाऱ्यासाठी मोठी पंचायत निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांतील माणुसकी जागी झाली अन् त्यानी भुकेने सैरा-वैरा भटकत असलेल्या गुरांची भूक क्षमवली. खर तर यासाठी अनेक संस्था किंवा दानशुरानी पुढे येण्याची आज खरी गरज आहे.

हिंगोलीत 'वर्दी'तली माणुसकी झाली जागी; मोकाट गुरांची भूक क्षमवली
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच हिंगोली मध्ये सात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याने नागरिक अजिबात घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या खाण्याची अबाळ होत आहे, परंतु नगरपालिका तसेच विविध सामाजिक संस्था, धामिर्क संस्था गरजवंतांपर्यंत अन्न-धान्याचे किट पोहोचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. परंतु प्रश्न निर्माण होतोय तो शहरातील मोकाट गुरांच्या चाऱ्यांचा, काही दिवस या गुरांची भूक भागवण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या होत्या, मात्र त्यांचे कार्य थंडावल्याने पुन्हा या गुरांचा चाऱ्यांचा भयंकर प्रश्न निर्माण झालाय.
Hingoli traffic police provided fodder for the animals
हिंगोलीत 'वर्दी'तली माणुसकी झाली जागी; मोकाट गुरांची भूक क्षमवली

रस्त्यावर ये-जा करणारे नागरिक पाहून गुरे त्यांच्याकडे बघून हंबरडा फोडत असल्याचे दिसताच रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यातील माणुसकी जागी झाली. लागलीच वाहतूक शाखेचे सपोनि ओंमकांत चिंचोळकर व अन्य कर्मचाऱ्यांनी हिंगोली शहरात चारा विक्रीसाठी आलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीकडून सर्वच चारा विकत घेतला व मोकाट जनावरांना पुरवला.

कधी नव्हे ते एक ठोक गिऱ्हाईक चालून आल्याने त्याच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पहावयास मिळाले. अन पोलीस वाहनात टाकून शहरभर फिरुन जेथे मोकाट गुरे दिसतील तिथे चारा टाकून त्यांची भूक शमवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलाय. खरंतर कोरोना सारख्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये गुरांची भूक शमविण्यासाठी अनेक सामाजिक, धार्मिक संघटनेसह नागरिकांनीही पुढे येण्याची नितांत गरज आहे. वाहतूक शाखेने आज गुरांची भूक भागवून कर्तव्य बजावल्याचे हिंगोलीकरांना पाहावयास मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.