हिंगोली- शहरातील गांधी चौक परिसरात एका दुचाकीस्वाराने धक्का लागण्याचे कारण समोर करून गाडीची तोडफोड केली. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन दुचाकीस्वारास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळण्यास मदत झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र दुचाकीस्वार पोलिसांना चकमा देवून फरार झाला.
दुचाकीस्वार होता नशेत-
उद्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन असल्याने शहरांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये पुणे येथून हिंगोली येथे आलेल्या एका महाराजांच्या चार चाकीला दुचाकीचा धक्का लागला. दुचाकीस्वार हा नशेत होता. त्याने दुचाकीवरून उतरून थेट चार चाकीवर दगड फेक करण्यास सुरुवात केली. गाडीवर चिखल फेक देखील करण्यात आली.
यामध्ये कारच्या सर्व काचा फुटल्या आहेत. घटनास्थळी एकच गर्दी झाली, हा प्रकार गांधी चोक येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दगड फेक करणाऱ्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वार हा एवढा नशेत होता की, त्याने वाहतूक शाखेच्या कर्मचाच्यावर देखील दगड उगारला.
पोलिसांच्या कर्तव्याबद्दल नाराजी-
पुणे येथील वासुदेव दिगंबर गिरी हे हिंगोली येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी चालकाला गाडी घेऊन रस्त्यावर येण्याचे सांगितले. ते बूट पॉलिश करण्यासाठी गेले होते. तोच काही वेळातच चालकाचा गिरी यांना फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेतली. तर गाडी तोपर्यंत पूर्णपणे चुराडा झाल्याचे दिसून आले. अचानकपणे एखादा अनोळखी व्यक्ती गाडी वर एवढा हल्ला करतोय. त्यामुळे आता दहशत वाढली आहे. यावर पोलिसांचा अजिबात अंकुश नसल्याचे सांगत गिरी यांनी पोलिसांच्या कर्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा- संतापजनक! आश्रम शाळेतील मुलीवर अधीक्षकानेच केला अत्याचार