हिंगोली - पप्पू चव्हाणच्या बळसोंड परिसरातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तब्बल सात लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा मागील अनेक दिवसांपासून या जुगार अड्ड्यावर नजर ठेवून होती. ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपींमध्ये रवी ओम प्रकाश यादव (रा. पेन्शनपुरा), साहेबराव गुंडाप्पा पावडे (रा. साईनगर नरसी फाटा), निलेश नागनाथ सुदुलवार (रा. रामकृष्ण नगर हिंगोली), शिवप्रसाद शामराव जाधव ( रा. विवेकानंदनगर अकोला बायपास), सचिन विजय गायकवाड, अशोक काशीराव मुंढे, जावेद खान माजिद पठाण, संदीप शंकर ढोके, शेख नजीर शेख पाशा, फिरोज शेख हनीफ, सोपान पिराजी गायकवाड, शेख रजाक शेख मुर्तुजा, शेख जावेद शेख मुर्तुजा, सय्यद शफी सय्यद अहमद, रामेश्वर नारायण शिंदे, आयुब कासिम प्यारेवाले अशी आरोपींची नावे आहेत.
घटनास्थळावरून सहा दुचाकी आणि १८ मोबाईल, असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार चालवणाऱ्या पप्पू चव्हाणवरही कारवाई करण्या आली आहे. आरोपींमध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, फौजदार केंद्रे, बालाजी बोके आदींनी ही कारवाई केली.