ETV Bharat / state

हिंगोलीत अडकून पडलेल्या चालकांसाठी उप-प्रादेशिक परिवहन विभागाकडून मदत

author img

By

Published : Apr 7, 2020, 3:51 PM IST

हिंगोलीत अडकून पडलेल्या ट्रक चालकांची खरी गरज ओळखून त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. भरारी पथकाच्या गाडी मध्ये सर्व अन्नधान्याचे पॉकेट बनवून वाहन चालकांना वाटप करण्यात आले.

hingoli police
हिंगोलीत अडकून पडलेल्या चालकांसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मदत

हिंगोली - जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने, इतर जिल्ह्यातील अनेक ट्रक हिंगोली जिल्ह्यात अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळ बंद असल्याने ट्रक चालकांची खाण्याची अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना उपाशीपोटी रात्र काढण्याची वेळ येत आहे. ही वेळ टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग पुढे आला असून, चालकांना खिचडी बनवता येईल एवढे साहित्य दिले आहे.

कोरोनाने हातावर पोट चालत असणाऱ्याची मोठी आबाळ होत आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत अडकलेल्यांसाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यासाठी विविध सामाजिक संस्था, सर्वसामान्य नागरिकसुद्धा मदत करण्यासाठी समोर आले आहेत. हिंगोलीत अडकून पडलेल्या ट्रक चालकांची खरी गरज ओळखून त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. भरारी पथकाच्या गाडी मध्ये सर्व अन्नधान्याचे पॉकेट बनवून वाहन चालकांना वाटप करण्यात आले. यामध्ये दोन किलो तांदूळ, एक किलो मूग डाळ, एक किलो शेंगदाणे, एक किलो गोडेतेल, तिखट, हळद, मीठ आदीचा समावेश आहे.

जिल्ह्यात वाहने तपासणी करीत असताना लॉकडाऊन संपेपर्यंत प्रत्येकी एक कीटचे वाटप केले जाणार आहे. आता 600 कीटच्यावर नोंदणी करण्यात आली आहे. तर अजूनही नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात अडकून पडलेल्या प्रत्येक चालकपर्यंत ही कीट पोहोचविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.

यासाठी मोटार वाहन निरीक्षक वसंत कळंबकर, सुरेश कंदकुर्तीकर, योगेश पाटील, जगदीश माने, शैलेश कुमार कोपुला, दिलीप कोंमलवार यांच्यासह कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.