हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे जून महिन्यात पाण्यासाठी दोन गटात झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरही घटनास्थळी न जाणे आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना चांगलेच भोवले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा... हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका
काय आहे प्रकरण ?
औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे गंभीर पाणी प्रश्न आहे. नेहमी प्रमाणे दलित वस्तीतील काही कुटुंब पाणी भरण्यासाठी जात होते. मात्र जून महिन्यात गावातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला अन यात चंद्रकलाबाई मोकिंद घुगे, राणोजी मोकिंदा घुगे, दत्ता मोकिंदा घुगे, गणेश विठ्ठल घुगे हे सर्वजण जखमी झाले होते. यापैकी चंद्रकलाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेड नंतर तेथून औरंगाबाद येथे नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांचा मृतदेह औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.
हेही वाचा... हिंगोलीकरांना पाण्याचे महत्व उमगले; गणेशभक्तांनी जलसंवर्धनाचा केला संकल्प
येळीच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र एवढी गंभीर घटना होऊनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घटनास्थळी साधी भेट देखील दिली नव्हती. आता मात्र हे प्रकरण जिल्हाधिकार्यांना चांगलेच भावले आहे., कारण चक्क विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. हा आदेश सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा... बाप्पा मोरया..! हिंगोलीत वृक्षलागवडीची मोठी चळवळ, नाशकात हेल्मेट बाप्पांचे आकर्षण