हिंगोली - दिवसेंदिवस मोबाईल वापरण्याची क्रेज वाढत चालली आहे. अशातच नवनवीन अँड्रॉइड मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने अशाच एका अट्टल मोबाईल चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा एक मित्र जेलची हवा खात असून, दुसरा एक मित्र फरार आहे. तर ताब्यात घेतलेल्या अट्टल चोरट्याकडून महागडे 21 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अजूनही त्याच्याकडून मोबाईल मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.
विविध पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल -
अटक केलेला आरोपी हा अटल मोबाईल चोरटा असून आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने अजून या आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत त्याचे अजून काही साथीदार मिळतात का, तसेच त्याच्याकडे अजून मोबाईल निघण्याची दाट शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलाकला सागर यांनी सांगितले. कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे,पोहेकॉ संभाजी लेकुळे, भगवान आडे आदींनी केली आहे.