हिंगोली Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 05ः09 वाजता भूकंप झाला. जेव्हा भूंकप झाला तेव्हा बरेच लोक झोपले होते. ज्यांना जाग आली त्यांनी आपल्या प्रियजनांना जागं केलं आणि घराबाहेर पळ काढला. भूकंपानंतर काही वेळानं दुसरे धक्के बसले, त्यानंतर लोक घाबरले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलं की, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदवली गेली. सुदैवानं यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
-
An earthquake of Magnitude 3.5 on the Richter scale hit Hingoli, Maharashtra at 5:09 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/OPsceoqIJw
— ANI (@ANI) November 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An earthquake of Magnitude 3.5 on the Richter scale hit Hingoli, Maharashtra at 5:09 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/OPsceoqIJw
— ANI (@ANI) November 20, 2023An earthquake of Magnitude 3.5 on the Richter scale hit Hingoli, Maharashtra at 5:09 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/OPsceoqIJw
— ANI (@ANI) November 20, 2023
जमिनीखाली केंद्रबिंदू : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप पहाटे 05:09 वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर खाली होता. त्यामुळं कोणतंही नुकसान झालं नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचं केंद्र तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 255 किलोमीटर आणि नागपूरपासून 265 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येतय.
अरबी समुद्रात धोकादायक भूकंप : हिंगोलीपूर्वी 19 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी समुद्रातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.36 वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजली गेली. तसंच रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील डोडा इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये रविवारी दुपारी 3.45 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि रविवारी सकाळी 11.30 वाजता जम्मू-काश्मीरच्या डोडा इथं 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
या वर्षी भूकंपामुळे अनेक देशांत मोठी हानी : भारतासह जगातील अनेक देशांमध्ये या वर्षी अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या वर्षी आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंप तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालाय. 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या या भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि लाखो लोक जखमी झाले होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये मोरोक्कोमध्ये एका शक्तिशाली भूकंपानं मोठा विध्वंस केला. या भूकंपात 2900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 5000 हून अधिक लोक जखमी झाले होते. ऑक्टोबरमध्ये भूकंपानं अफगाणिस्तानातही मोठी हानी झाली होती. या भूकंपात 2000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर 9000 हून अधिक लोक जखमी झाले होते.
भूकंप का होतात : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांकडे सरकत राहतात. जेव्हा जेव्हा दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा घर्षणामुळे ऊर्जा बाहेर पडते आणि ती लाटांच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते. यामुळं आपल्याला धक्के जाणवतात. या प्रक्रियेला भूकंप म्हणतात.
हेही वाचा :