ETV Bharat / state

दुर्गा महोत्सवात भपकेबाजी नकोच; हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या दुर्गा मंडळांना कडक सूचना - Durga Festival Board Notice Hingoli

हिंगोलीतील दसरा महोत्सव हा संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर येतो. दसरा महोत्सव आता अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. शहरापासून जवळच असलेल्या खाकीबाबा मठात आज प्रशासनाच्या वतीने बासा पूजा आटोपण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ज्याप्रमाणे गणेश उत्सव यावर्षी अतिशय शांतपणे साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे दुर्गा महोत्सव देखील शांतपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

दुर्गा महोत्सव
दुर्गा महोत्सव
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:43 PM IST

हिंगोली- जिल्ह्याचे वैभव असलेला दसरा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बासा पूजनही झालेले आहे. गणेशोत्सवप्रमाणेच हा देखील महोत्सव शांततेत आणि गर्दीविना करण्यासह भपकेबाजी आजिबात केली जाऊ नये. सोबतच सार्वजनिक ४, तर घरगुती २ फुटाची दुर्गा मूर्ती ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. तसेच, यंदा कोणी वर्गणी मागायची नाही. जेवढी दिली तेवढीच घ्यायची, अशा अनेक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.

हिंगोलीतील दसरा महोत्सव हा संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर येतो. दसरा महोत्सव आता अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. शहरापासून जवळच असलेल्या खाकीबाबा मठात आज प्रशासनाच्या वतीने बासा पूजा आटोपण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ज्याप्रमाणे गणेश उत्सव यावर्षी अतिशय शांतपणे साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे दुर्गा महोत्सव देखील शांतपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. तसेच, महोत्सवामध्ये नेमके काय असायला हवे आणि काय नसायला हवे याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.

या आहेत सूचना..

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांचा परवाना घेणे बंधनकारक आहे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळकरिता ४ फूट, घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूट एवढीच असावी. तसेच, या ठिकाणी केवळ ४ व्यक्तींना मूर्तीची स्थापना व विसर्जन करता येणार आहे. देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनात केवळ चार व्यक्ती राहणे गरजेचे आहे. यंदा शक्य तर पारंपरिक देवीच्या मूर्ती ऐवजी घरातील धातू आदी मूर्तीचे पूजन करावे.

शाडूची मूर्ती किंवा पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन हे शक्यतो आपल्या घरच्या घरीच करावे, ते शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. नवरात्र उत्सवकरिता वर्गणी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. गर्दी होणार नाही यासाठी जाहिरातबाजी टाळावी. तर आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. मुख्य म्हणजे, नवरात्र उत्सवामध्ये गरबा व दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. मात्र, या विदारक परिस्थितीमध्ये हे कार्यक्रम पूर्णता रद्द करण्यात यावेत. देवीच्या मूर्तीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनी व मंडळातील सदस्यांनी सामाजिक अंतर, मार्ग स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींचे पालन करून पूजा करावी. तर, पुजाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पूजा करण्यास परवानगी राहणार नाही. अशा सूचना आहे.

तसेच, आरती, भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना केवळ चार व्यक्तींपेक्षा जास्त नागरिक अजिबात असू नये. इतर भाविकांसाठी फेसबुक लाईव्ह लोकल केबल किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून प्रक्षेपण करावे. तसेच पर्यावरण नियंत्रण मंडळाने किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्यांचा वापर करून ध्वनी किंवा हवेचे प्रदूषण करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. मंदिर परिसर किंवा नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी, सोबतच विसर्जन या ठिकाणी देखील गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलेचे सादरीकरण करण्यास परवानगी नकारण्यात आली आहे. अशा अनेक सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्या दुर्गा मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा- मराठा आरक्षणसह ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हिंगोलीत बैलगाडी मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.