ETV Bharat / state

हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज चिन्हांचे वाटप - हिंगोली जिल्हा लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यात 495 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिन्ह वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्यापासून प्रचारास सुरुवात होणार आहे. आपल्या पसंतीचे चिन्ह मिळवण्यासाठी उमेदवारांची स्पर्धा लागल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज चिन्हांचे वाटप

author img

By

Published : Jan 4, 2021, 5:40 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात 495 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिन्ह वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्यापासून प्रचारास सुरुवात होणार आहे. आपल्या पसंतीचे चिन्ह मिळवण्यासाठी उमेदवारांची स्पर्धा लागल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

गावाचे मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. मात्र यावेळी आपल्या पंसतीचे चिन्ह मिळावे यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू होते. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना विविध चिन्ह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र उमेदवारांनी गॅसच्या चिन्हाला सर्वाधिक पसंती दिली, तसेच हेच चिन्ह आपल्याला मिळावे अशी मागणी अनेक उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे केल्याचेही पाहायला मिळाले.

गॅस हेच चिन्ह हवे

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १९० वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे निवडणूक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आपल्या पसंतीचे चिन्ह मिळावे यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न करण्यात येत होते. यामध्ये सर्वाधिक उमेदवारांनी गॅसच्या चिन्हाला पसंती दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज चिन्हांचे वाटप

उमेदवारांना कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना

अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, त्यामुळे आज चिन्ह वाटपाच्या वेळी कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून उमेदवारांना देण्यात आल्या. गर्दी न करने, मस्क वापरने, योग्य सुरक्षीत अंतर ठेवने अशा प्रकारच्या सूचना यावेळी उमेदवारांना देण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.