ETV Bharat / state

मुलाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेला ठेवले डांबून, पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ - hingoli crime news

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांनी हिंगोली येथे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर, शहर पोलीस ठाण्यात घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

हिंगोली क्राईम
हिंगोली क्राईम
author img

By

Published : Apr 14, 2020, 2:40 PM IST

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एका महिलेला बचत गटात सहभागी करून घेण्याच्या बहाण्याने फसविल्याची घटना घडली आहे. ही कागदपत्रे हिंगोलीत असल्याचे सांगून तिला हिंगोली येथे महिनाभर डांबून ठेवण्यात आले होते. यारम्यान, तिच्या एका वर्षाच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन तिच्याकडे लग्न करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर मुलीला सोडवून आणले होते. मात्र, मुलीला लग्नासाठी महिनाभर डांबून ठेवल्याची आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत.

संबंधित महिलेच्या जबाबावरून पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाहीत. उलट, गोरेगाव पोलिसांनी तिला गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याकडे पत्र देऊन पाठविले. या महिलेकडून बचतगटात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने तिच्याकडून कागदपत्रे घेण्यात आली होती. ही कागदपत्रे हिंगोलीत असल्याचे सांगून तिला दुचाकीवरून हिंगोलीला नेण्यात आल्याचे तिने सांगितले आहे. त्यानंतर मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला महिनाभर डांबून ठेवले होते.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांनी हिंगोली येथे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर, शहर पोलीस ठाण्यात घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, 'या महिलेला गोरेगावलाच परत पाठवा. तेथे तक्रार दाखल करण्यास सांगतो,' असे ते म्हणाले. मागील चार दिवसांपासून ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस दरबारी खेटे घालत आहे. मात्र, तक्रार दाखल करून न घेण्याचे कारण अद्याप कळलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.