ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; बळीराजा सुखावला

हिंगोलीतील शेतकरी मागील १५ दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. ती प्रतीक्षा आजच्या पावसाने संपल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोलीतील पाऊस
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:30 PM IST

हिंगोली - राज्यात सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने आज (शनिवारी) जिल्ह्यात सकाळ पासूनच हजेरी लावली. मात्र, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू लागला. या पावसामुळे खरीप हंगामाची पिके आता धोक्या बाहेर गेली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आज कुठे पहाटेपासून रात्रीपर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. केवळ १५.८० टक्केच पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मागील वर्षी आतापर्यंत ३४ टक्के पाऊस झाला होता. या वर्षी पाऊस लांबणीवर गेल्याने, सोयाबीनच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पावसाने नदी नाल्याना पाणी आले नाही, तसेच विहीर बोअरची पाणी पातळी देखील वाढलेली नाही. मात्र पिकांना जीवदान मिळाले आहे.

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊसच न झाल्यामुळे कोळपणीस आलेल्या पिकांची कोळपणी थांबवली होती. मात्र, आजच्या पावसाने खुरपणीसह कोळपणीला गती येणार आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने पिकांची वाढ खुंटली असली तरी आज हजेरी लावलेल्या पावसामुळे पिके टवटवीत दिसून येत होती. शेतकरी मागील १५ दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. ती प्रतीक्षा आजच्या पावसाने संपली. पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात आज सकाळ पासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपार नंतर पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला मात्र रात्रीच्या आठ नंतर पावसाचा जोर एवढा वाढला की मेघगर्जनेसह हजेरी लावलेल्या पावसाने मात्र खरीप हंगामाची पिके आता धोक्या बाहेर गेले आहेत. शेतकरी मागील पंधरा दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. ती प्रतीक्षा आज संपली. पावसाने शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आज कुठे पहाटेपासून रात्रीपर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील अत्याल पर्जन्यमान झाले केवळ 15. 80 टक्केच पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मागील वर्षी आतापर्यंत 34 टक्के पाऊस झाला होता. या वर्षी पाऊस लांबणीवर गेल्याने, सोयाबीनच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगितले. शनिवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पावसाने नदी नाल्याना पाणी आले नाही, तसेच विहीर बोअर ची पाणी पातळी देखील वाढलेली नाही. मात्र पिकांना जीवदान मिळालंय.

Conclusion:पाऊसच नसल्याने, कोळपणीस आलेल्या पिकांची कोळपणी देखील थांबवली होती. मात्र आजच्या पावसाने खुरपणी सह कोळपनीला गती येणार आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने पिकांची वाढ खुंटली असली तरी आज हजेरी लावलेल्या पावसामुळे पिके टवटवीत दिसून येत होती.

व्हिज्युअल ftp केलेय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.