ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर; नरशी येथून वाहून गेलेला मृतदेह सापडला - hingoli police news

दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार वाढला आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. यामध्ये या दुधडी भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यामुळे गुरे, ग्रामस्थ वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. नरशी येथून वाहून गेलेल्या नागरिकाचा मृतदेह हा हिंगोली शहराच्या पुढे आढळून आला आहे.

heavy Rain in Hingoli district; dead body find near by kayadhu river
नरशी येथून वाहून गेलेला मृतदेह सापडला
author img

By

Published : Sep 7, 2021, 10:49 PM IST

हिंगोली - जिल्हाभरात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. दोन दिवसात तर पावसाचा एवढा हाहाकार वाढलाय. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात गुर तसेच ग्रामस्थ वाहून जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील पाणी ओसरण्यासाठी प्रवाशांना रात्रभर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. नरसी पोलीस ठाणे हद्दीतून वाहून गेलेला मृतदेह हिंगोली शहरापासून काही अंतरावर आढळला आहे. सदरील मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

कयाधू नदी परिसरात एकाचा आढळला मृतदेह -

हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विभागानुसार कोण कोणत्या तारखेला पाऊस पडणार? किती पडणार, याचा संपूर्ण अंदाज सांगितला होता. उत्तर महाराष्ट्रात ७, ८ आणि ९ तारखेला मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसातून तर एवढा पाऊस होतोय, त्यामुळे नदी नाले तलाव, धरणे फुल झाली आहेत. दोन दिवसापुर्वी कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे गावाजवळून वाहत असलेल्या ओढ्यात एक सहा वर्षीय चिमुकली वाहून गेली, तर त्याच दिवशी सेनगाव तालुक्यातील गांगलवाडी परिसरातून वाहनाऱ्या नदीतूनही एक जन वाहून गेला. तसेच बन बरडा येथील उद्धव काळे हे देखील पूर्णा नदीत वाहून गेले होते. आज सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहराच्या टोकावरुन वाहणाऱ्या कयाधू नदी परिसरात एकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाली असून, म़तदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

नरसी पोलीस हद्दीतून वाहून आला मृतदेह -

हिंगोली शहरापासून काही अंतरावर आढळून आलेला मृतदेह हा नरसी पोलीस ठाणे हद्दीतून वाहून आला आहे. तो मृतदेह पारडी येथील व्यक्तीचा असल्याची माहिती मिळतेय, मात्र पाण्यामध्ये मृतदेह असल्याने, चेहरा तेवढा ओळखू येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Drone Video : मुसळधार पावसामुळे बोरी नदीला महापूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.