ETV Bharat / state

हिंगोली : आशा वर्करांना मानधनासह मिळाला वाढीव मोबदला - हिंगोली आशा वर्कर न्यूज

आशा वर्करांना त्यांचे जे काही असलेले मानधन तर देण्यातच आले आहे. शिवाय, जो काही वाढीव मोबदला आहे. तो देखील देण्यात आला असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली.

Govt paid the hingoli district asha worker salary
हिंगोली : आशा वर्करांना वेतनासह मिळाला वाढीव मोबदला
author img

By

Published : Dec 12, 2020, 9:22 AM IST

हिंगोली - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रात्रंदिवस एक करीत आरोग्य विभागासाठी अन शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी राब-राब राबणाऱ्या आशा वर्करांना त्यांचे जे काही असलेले मानधन तर देण्यातच आले आहे. शिवाय, जो काही वाढीव मोबदला आहे. तो देखील देण्यात आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात एकूण 1हजार 70 आशा वर्कर कार्य करत आहेत. यामध्ये शहरी ठिकाणी 67 तर ग्रामीण भागात 1 हजार 8 आशा वर्करची संख्या आहे. या कोरोना काळात ज्या काही आरोग्य विभागाच्या सूचना तसेच केंद्र शासनाच्या सूचना, शासकीय योजना ग्राम स्तरावर राबविण्यात या आशा वर्करांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. एवढेच नव्हे तर या आशा वर्करांमुळे अनेक गर्भवती व प्रसूती मातांना योग्य ती मदत देखील झालेली आहे. ऐन वेळी मतांच्या मदतीसाठी आशा वर्कर धावून गेलेल्या आहेत.

आशा वर्करांना मानधनासह मिळाला वाढीव मोबदला...
कोरोना काळात केलेली कामेअजूनही कोरोना मधून आपण सावरलेलो नाही. मात्र अशा ही विदारक परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागातील आशा वर्करांनी खूप मोलाचे काम केले आहे. शासनाचे जे 62 कार्यक्रम असतात ते राबविण्यासाठी ह्या आशा वर्कर धडपडत आहेत. यांची धडपड पाहून दर वर्षी आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्करांचा कामाचा तपशील पाहून त्यांना पुरस्काराने देखील सन्मानित केले जाते. त्यामुळे तेवढ्याच गतीने ह्या आशा वर्कर काम करीत आल्याचे गीते यांनी सांगितले.पाच वर्षांपासून राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आपल्या जिल्ह्यातील आशा वर्करांचे काम हे उत्कृष्ट आल्याने, गेल्या पाच वर्षांपासून हिंगोली जिल्हा हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये अजिबात खंड पडू दिला नाही. हेच बघून आशा वर्करांचा दर वर्षी सत्कार देखील केला जात आहे.

एवढे असते फिक्स मानधन
आशा वर्करला महिन्याकाठी 2 हजार एवढे फिक्स मानधन राहते. मात्र 5 ते 6 हजार पर्यत त्यांना त्यांच्या कामावर वाढीव रक्कम ही मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील आशा वर्करांनी शासकीय योजना प्रत्येक गावातील लोकापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. गीते यांनी केले आहे.

एवढी आहे तालुकानिहाय आशा वर्करची संख्या
ओंढा - 181, वसमत - 228, हिंगोली - 166, कळमनुरी - 228, सेनगाव - 205 असे एकूण 1 हजार 8 तर शहरी ठिकाणी 62 असे एकूण 1 हजार 70 एवढी आशा वर्करची संख्या आहे.

हेही वाचा - विहरित आढळला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा मृतदेह

हेही वाचा - हिंगोलीत अंगावर खाजेचे औषध टाकून चोरट्याने 1 लाख रुपये पळविले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.