ETV Bharat / state

शिवजयंतीच्या खर्चाला फाटा, जमा निधीतून वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत

जिल्ह्यातील मेथा येथील ग्रामस्थांनी शिवजयंतीसाठी जमा झालेला ४ हजार २०० रुपयांचा निधी पीडित कुटुंबीयांच्या जवानांना देण्याचा निर्णय घेतला.

पुलवामा हल्ला
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:59 AM IST

हिंगोली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न संपूर्ण देशातून केला जात आहे. जिल्ह्यातील मेथा येथील ग्रामस्थांनी शिवजयंतीसाठी जमा झालेला ४ हजार २०० रुपयांचा निधी पीडित कुटुंबीयांच्या जवानांना देण्याचा निर्णय घेतला. दर वर्षी मोठ्या उत्साहात होणारी शिवजयंती यंदा अतिशय शांततेने साजरी करण्यात आली.

पुलवामा येथील घटनेने संपूर्ण देश दुःखात आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे कार्यक्रम घेणे टाळले जात असून, सर्वप्रथम वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तर बहुतांश लग्नसमारंभात देखील जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यास सुरुवात केली जात आहे. तर जवानांच्या कुटुंबाला फुल नाही फुलांची पाकळी म्हणून अनेकांकडून मदत केली जात. याच प्रकारची काही मदत ग्रामीण भागातील युवकांकडून देण्यात आली.

एकीकडे सर्वसामान्यांकडून मदत केली जात असताना शासकीय विभागाकडून मदत केल्याचे ऐकण्यात आले नाही. मात्र, या ग्रामस्थांकडून घेतलेला निर्णय खरोखरच आदर्श ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन जवानांच्या प्रत्येकी खात्यावर २ हजार १०० असा ४ हजार २०० रुपयांचा निधी टाकण्यात आला.

undefined

Intro:जम्मू- काश्मीर मधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमुळे आखा देश दुःखात डूबला आहे. शहीद जवानांच्या नातेवाईकाना फुल नाही फुलांची पाकळी म्हणून सर्विकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील मेथा येथील ग्रामस्थांनी शिवजयंतीसाठी जमा झालेला ४ हजार २०० रुपयांचा निधी जवानांच्या खात्यावर टाकून एक आदर्श निर्माण केला. दर वर्षी मोठ्या उत्साहात होणारी शिवजयंती यंदा अतिशय सध्या पद्धतीने केली.

Body:पुलवामा येथील घटनेने संपूर्ण देश दुःखात आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शक्यतोर कोणतेही उत्साहाचे कार्यक्रम घेणे टाळले जात असून, सर्वप्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तर बहुतांश लग्नसमारंभात देखील जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यास सुरुवात केली जात आहे. तर जवानांच्या कुटुंबाला फुल नाही फुलांची पाकळी म्हणून अनेज जण मदत करत आहेत. अशीच मदत हिंगोलीतुन करण्यासाठी ग्रामीण भागातील युवक पुढे आले आहेत. मात्र अजून तरी कोणत्या शासकीय विभागाकडून मदत केल्याचे ऐकण्यात आले नाही. मात्र एका खेडेगावातील ग्रामस्थ तसेच युवकांनी हा घेतलेला निर्णय खरोखरच आदर्श आहे. अजूनही आर्थिक मदत करणार आल्याचे युवक सांगत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नितीन राठोड अन संजय राजपूत या दोन जवानांच्या प्रत्येकी खात्यावर २ हजार १०० असा ४ हजार २०० रुपयांचा निधी टाकला आहे.

Conclusion:वाटसप वर व्हायरल झालेल्या जवानांच्या खात्यावर बँकेत जाऊन निधी टाकला आहे. तर हिंगोलीतीलच एका शिक्षिकेने देखिल या जवानांच्या मुलाची पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. निधी बँकेत जमा करताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते., निधी मेल केकेल्या बँक च्या पावत्या मेल केल्या आहेत. त्या बातमीत वापराव्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.