ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: लाखोंचे उत्पन्न देणारी फुले माती मोल... शेतकरी आर्थिक संकटात

हिंगोलीतील फुल उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. झाडाची पाने गळू नये म्हणून फुले रोजच्या रोज तोडावी लागत आहेत. तर काही ठिकाणी झाडालाच वाळून गेलेल्या फुलांची झाडेच उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Flowers
फुले
author img

By

Published : Apr 25, 2020, 9:45 AM IST

हिंगोली - कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व आर्थिक गणितेच विस्कटली आहेत. हिंगोलीतील फुल उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. झाडाची पाने गळू नये म्हणून फुले रोजच्या रोज तोडावी लागत आहेत. तर काही ठिकाणी झाडालाच वाळून गेलेल्या फुलांची झाडेच उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील शेतकरी चंद्रकांत गौबाडे, चंद्रकांत ऋषी हे गेल्या अनेक वर्षांपासून फुल शेती करतात. यांच्या शेतात लिली, शेवंती, अश्वगंधा, निशिगंधा आदी प्रकारची फुले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विवाह समारंभ, मंदिराचे बंद ठेवण्यात आले आहेत.

लाखोंचे उत्पन्न देणारी फुले टाकावी लागत आहेत उपटून

याचा परिणाम फुल शेतीवर झाला आहे. फुलांना मागणीच नसल्याने फुल शेती उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी फुले सध्या झाडालाच सुकून जात आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱयांनी फुलांची झाडे उपटून टाकली आहेत. तर गुलाबाची फुलांची झाडं खराब व्हायला नको म्हणून रोजच्या रोज तोडली जात असल्याचे शेतकरी चंद्रकांत गोबाडे यांनी सांगितले.

फुल उत्पादक शेतकऱ्याची ही विदारक अवस्था पाहून सरकारने फुल उत्पादक शेतकऱयांनाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत ऋषी यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.