ETV Bharat / state

हिंगोलीत गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी उलटली; ५ गायी जखमी - accident

गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी नवीच आहे. एवढेच नाही, तर गाडीची पासिंगदेखील करण्यात आलेली नाही. या गाडीतून रात्रीच्यावेळी गायींची वाहतूक केल्याने या गायी गोहत्येसाठी तर नेल्या जात नव्हत्या ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आग विझवताना अग्निशमन दल
author img

By

Published : Jun 25, 2019, 11:28 AM IST

Updated : Jun 25, 2019, 7:37 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत-कुरुंदा मार्गावर गायी घेऊन जाणारी पिकअप गाडी उलटली. या अपघातात चार ते पाच गायी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. या गाडीत अडकलेल्या गायींची ग्रामस्थांनी सुटका केली. अपघातानंतर संबंधित पिकअप गाडी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.

गायींची वाहतूक करणारा ट्रक जळताना
वाहन उलटल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. येथे पोहोचलेल्या ग्रामस्थांना काही गायी गाडीत अडकलेल्या आढळून आल्या. त्यांनी त्या गायींची सुटका केली. तसेच चालकाचा शोध घेतला. मात्र. त्याठिकाणी कुणीही दिसून आले नाही. त्यानंतर वसमत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी नवीच आहे. एवढेच नाही, तर गाडीची पासिंगदेखील करण्यात आलेली नाही. या गाडीतून रात्रीच्यावेळी गायींची वाहतूक केल्याने या गायी गोहत्येसाठी तर नेल्या जात नव्हत्या ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलीस वाहनमालकाचा शोध घेत आहेत, तर जखमी गायींवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली जात आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यातील वसमत ते कुरुंदा या मार्गावर गाई घेऊन जाणारा पिकअप पहाटे च्या सुमारास उलट त्याची घटना घडली चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून अस्ताव्यस्त पडलेल्या गाईंची ग्रामस्थांनी सुटका केली. यामध्ये चार ते पाच गाईगंभीर जखमी झाल्या आहेत. गायी बाहेर काढल्यानंतर पिकअप पेटून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Body:अजूनही काही केल्या गोहत्याबंदी झालेली नाही चोरी चुपे अजून ही जिल्ह्यात गाईंची वाहतूक सुरूच आहे. वाहतूक करणारे वाहन चालक भीतीपोटी सुसाट वेगाने ही वाहने चालवतात अशीच घटना वसमत ते कुरुंदा मार्गावरील कवठा या गावावाजळ घडली. वाहन पलटी झाल्यानंतर घटनास्थळावरून चालकाने पळ काढला. वाहनांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या गाई तर काही जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या गाई काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या, त्यांनी तात्काळ पलटी झालेल्या वाहनाजवळ धाव घेऊन गुंतून पडलेल्या गायीची सुटका केली. आजू बाजूला चालकाचा शोध घेतला. मात्र कोणीही दिसून आले नाही. तर काही वेळाने वाहन पेटलेल्या अवस्थेत दिसुन आले. Conclusion:घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले, वसमत येथील अग्निशमन दलाने ही धाव घेऊन,आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पिकअप विना पासिंग असून नवे कोरे वाहन आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी गायीची वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस वाहन मालकाचा शोध घेत आहेत. तर जखमी गायिवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा केली जात आहे.
Last Updated : Jun 25, 2019, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.