ETV Bharat / state

आता विहीर शोधून द्या.. नाही तर आत्महत्या करतो, हिंगोलीतील शेतकऱ्याचा इशारा - हिंगोली जिल्हा बातमी

येहळेगाव येथील एका शेतकऱ्यावर विहीर नसताना चक्क 4 हजार युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आता शासनाला विहीर शोधून देण्याची मागणी केली आहे.

Hingoli
चक्क विहीर गेली चोरीला
author img

By

Published : Feb 9, 2020, 10:53 AM IST

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथील एका शेतकऱ्यावर विहीर नसताना चक्क 4 हजार युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. यावरून शेतकऱ्याला पोलीस कोठडीची हवाही खावी लागली आहे. तर न्यायालयानेही शेतकऱ्याला 71 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शासनाने आता ही विहीर शोधून द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर सोळंके (रा. येहळेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोळंके यांच्याकडे 1 हेक्टर बागायती शेती आहे. सोळंके यांच्या शेतात बोअर आणि विहीर नसल्यामुळे पिकांची जोपासना करण्यासाठी ते शेजाऱ्याकडून उसने पाणी घेऊन शेती करतात. दरम्यान, 29 सप्टेंबर 2018 ला वीज चोरी पकडण्यासाठी वीज वितरण विभागाचे अधिकाऱ्यांनी येहळेगाव आले होते. त्यावेळी त्यांनी परिसरातील 7 ते 8 जणांची वीज चोरी पकडली. तसेच सोळंके यांच्यावरही वीज चोरीचा आरोप केला. एवढेच नाही तर सोळंके यांच्यावर सेनगाव पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे विहिरीचे फोटोदेखील काढल्याचा उल्‍लेख पंचनाम्यात करण्यात आला आहे.

चक्क विहीर गेली चोरीला

हेही वाचा - हिंगोलीतील 'या' गावात धगधगत्या निखाऱ्यावरून धावतात भक्त

दरम्यान, सोळंके यांना अटक करण्यासाठी पोलीस आले त्यावेळी सोळंके कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी सोळंके यांनी माझी विहीरच नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. पोलिसांनी सोळंके यांना वसमत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयानेही त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानहगी केली. त्यानंतर सोळंके हे जामीनावर सुटल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि औढा पोलीस ठाण्याला विहीर शोधून देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या शेतकऱ्याला 4 फेब्रुवारी 2019 ला अटक करण्यात आली तर 6 फेब्रुवारीला जामीनावर सुटका करण्यात आली. ही घटना 2019 मध्ये घडल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. गेल्या 8 दिवसांपूर्वी शेतकऱ्याला आरोपत्र मिळाले असल्यामुळे शेतकऱ्याने विहीर शोधून देण्याची मागणी केली आहे.

तर एवढ्यावरच न थांबत सोळंके हे मंत्रालयात धाव घेऊन, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना देखील भेटून विहीर शोधून देण्याचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी सरकार दोषींवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Intro:

हिंगोली- अधिच महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे निसर्गाच्या समतोल पणामुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अन अशाच परिस्थितीत काही अधिकाऱ्यांच्या चुकीला शेतकऱ्याला जावं लागतं आहे. याचा कडू अनुभव हिंगोलीतल्या एका शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे आलाय. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकऱ्याने विहीर नसलेल्या शेतात विहीर असल्याचे दाखवत तिथे वीज चोरी केल्याचा आरोप करून शेतऱ्यावर ओंढा ना. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. अन शेतकऱ्याला अटक केलीय. हे प्रकरण न्यायालयात चालले असून, शेतकऱ्याला 71 हजाराचा न्यायाल्याने दंड ठोठावलाय. त्यामुळे आता हरवलेली विहीर अधिकाऱ्यांनी शोधून द्यावी या मागणीसाठी शेतकरी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे.

Body:
ज्ञानेश्वर सोळंके रा. येहळेगाव सो अस गुन्हा दाखल झालेल्या शेतऱ्याच नाव आहे. सोळंके यांच्याकडे एक हेक्टर बागायती शेती आहे. मात्र सोळंके यांच्या शेतात ना बोअर ना कुठली विहीर त्यामुळे ते शेतातील पिकाची जोपासना करण्यासाठी उसने पाणी घेऊन करीत असत, अशाच परिस्थितीत 29 सप्टेंबर 2018 रोजी वीज चोरी पकडण्यासाठी वीज वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी परिसरात इतर ठिकाणी छापे टाकून चोरून वीज वापरल्या मुळे सात ते आठ जणांचे अनधिकृत जोडणी पकडली त्याच पैकी सोळंके यांनी देखील वीज चोरी केल्याचा आरोप करीत ओंढा ना गनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सोळंके यांना अटक करण्यासाठी जेव्हा पोलीस गेले तेव्हा कुठे हा प्रकार त्यांच्या व घरच्याच्या लक्षात आला. हा प्रकार पाहून कुटुंबांना धक्काच बसला. ते माझी विहिर नसल्याच पोलिसांना खूप सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांचे अजिबात काही ही न ऐकत हातकडी घेतली. नंतर वसमत न्यायालयात हजर केले व दोन दिवसासाठी परभणीच्या कारागृहात रवानगी केली. जमीन झाल्यानंतर ते घरी आले अन जेल मध्ये जावे लागलेल्या विहिरीचा शेतात शोध घेऊ लागले. मात्र त्यांना कुठेही विहीर दिसली नाही. Conclusion:जवळपास सहा महिन्यांपासून ते विहिरीचा शोध घेत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी सोळंके यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अन ओंढा ना पोलीस ठाण्यात विहीर शोधुन देण्याची मागणी केलीय. एवढेच नव्हे तर सोळंके हे मंत्रालयात धाव घेऊन, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना देखील भेटून विहीर शोधून देण्याचे निवेदन देणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता त्या अधिकऱ्याना मुख्यमंत्री काय धडा शिकवणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी कॅमेऱ्या समोर बोलण्यास स्पष्ट नकार देत आहेत.या प्रकाराने मात्र मकरंद अनसपुरेच्या चित्रपटाची आठवण करून दिलीय.

बाईट-
शेतकरी- ज्ञानेश्वर सोळंके
शेतकरी - पत्नी ज्योती सोळंके
शेतकऱ्याची - मुलगी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.