ETV Bharat / state

'भेंडीचे भाव वाढलेले सांगतात अन् आमच्याकडून मात्र कवडीमोलाने खरेदी करतात'

कोरोनाच्या स्थितीमुळे जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यावर यंदा चांगलेच संकट कोसळले आहे. त्यातच पर्जन्यमान जास्त झाल्याने शेतीपिकांसह भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी हा तग धरून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, योग्य भावच मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

Farmers in trouble due to lack of prices for vegetables in hingoli
'भेंडीचे भाव वाढलेले सांगतात अन आमच्याकडुन मात्र कवडीमोल दराने खरेदी करतात'
author img

By

Published : Jul 29, 2020, 3:56 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या स्थितीमुळे जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यावर यंदा चांगलेच संकट कोसळले आहे. त्यातच पर्जन्यमान जास्त झाल्याने शेतीपिकांसह भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी हा तग धरून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, योग्य भावच मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचे भाव हे गगनाला भिडले असल्याचे बातम्यांमध्ये वाचले, अन दाखवलेही जातेय. मात्र, प्रत्यक्षात आमच्याकडून व्यापारी हे कवडीमोल दराने भाजीपाल्याची खरेदी करत आहेत. यातून भांडवली खर्चही निघत नसल्याची खंत एका भेंडी उत्पादक शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

बबन नामदेव मते (रा. तपोवन ता. सेनगाव) असे भेंडी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. मते हे मागील तीन ते चार वर्षांपासून भाजीपाल्याची शेती करतात. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने, शेतात पजीपाला हा चांगला बहरतोय. यातून दरवर्षी मते यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्व अर्थचक्रच बदलून गेले आहे. गत वर्षीप्रमाणेच यंदाही भाजीपाला दर्जेदार आहे. भेंडी तर नजरेत बसेल अशी आहे, मागणीही जास्त आहे. कोरोनामुळे पूर्वीप्रमाणे मंडीत भेंडी घेऊन जाता येत नाही, त्यामुळे व्यापारीच भेंडीसह भाजीपाला घेऊन जाण्यासाठी शेताच्या बांधावर धावून येत आहेत. मात्र, येण्याजण्याची पूर्ण कसर ते भरून काढत भेंडी प्रति 7 ते 8 रुपये किलो या कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. अन दुसरीकडे मात्र बातम्यामध्ये भाजीपाल्याचे भडकलेले दर दाखवले जातात. भाजीपाला उत्पादनात वास्तव हे आहे.

आज घडीला 70 रुपये कॅरेटप्रमाणे भेंडी विकण्याची वेळ बबन मते या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून लागवडी खर्चही निघत नसल्याची खंत मते यांनी व्यक्त केली आहे. अगोदरच करणामुळे संपूर्ण शेतीचे नियोजन व शेतीसाठी लागणारे औषधी मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जीवाची बाजी लावून, शेती पिकवीत आहेत. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या कोरोनाचा प्रत्येकाला फटका बसला आहे. बरेचजण कोरोनाचा सामना देखील करत आहेत. परंतु, शेतकऱ्यावर याचा मोठा परिणाम झाला असून, निसर्गाच्या अवकृपेतून वाचवलेल्या पिकालाही कोरोनामुळे भावच मिळत नसल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे.

ही परिस्थिती एकट्या मते या शेतकऱ्यावर नसून हिंगोली जिल्ह्यातील असंख्य शेतकरी हे अडचणीत सापडले आहेत. त्यात मुख्य म्हणजे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. कवडीमोल किंमतीमध्ये भाजीपाला विक्री करण्याची या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अजिबात इच्छा नसते. मात्र, एवढा मोठा भाजीपाला जवळ ठेवून करणार तरी काय? हा प्रश्न त्यांना नेहमीच बोचत राहतो. त्यामुळे मिळेल, त्या किमतींमध्ये ते भाजीपाल्याची विक्री करून आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.