ETV Bharat / state

पीक कर्जाचा गुंता सुटलेला नाही; भजन करून शेतकऱ्यांनी वेधले लक्ष - पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

पीककर्ज मिळत नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली औंढा नागनाथ येथील भारतीय स्टेट बँकेसमोर शेतकऱ्यांनी भजन तसेच जागरण, गोंधळ केला. शासनासह बँक व्यवस्थापकाचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.

Farmers' agitation in front of State Bank
स्टेट बँकेसमोर शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ
author img

By

Published : Oct 19, 2020, 6:26 PM IST

Updated : Oct 19, 2020, 6:57 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील खरीप पीक कर्जाचा गुंता अजूनही सुटलेला नाही. आजही पीक कर्जासाठी शेतकरी विविध बँकेमध्ये चकरा मारत आहे. पीककर्ज मिळत नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली औंढा नागनाथ येथील भारतीय स्टेट बँकेसमोर शेतकऱ्यांनी भजनासह जागरण गोंधळ केला. शासनासह बँक व्यवस्थापकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.

स्टेट बँकेसमोर शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ
आधीच शेतकरी अस्मानी संकटाने ग्रासलेला असताना बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. म्हणूनच त्रस्त शेतकऱ्यांकडून आज औंढा नागनाथ येथील एसबीआय बँकेसमोर भजन आंदोलन करण्यात आले. शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला असून हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पीक कर्ज देण्याची शेतकरी वारंवारविनंती करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांना बॅंकेतही येऊ दिले जात नसल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून द्या! अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. औंढा येथील शिवसेना तालुका उपप्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Last Updated : Oct 19, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.