ETV Bharat / state

तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याला घातला 2 लाखाचा गंडा

author img

By

Published : Dec 15, 2019, 2:38 AM IST

व्यापारी अभयकुमार यंबल हे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील अॅक्सिस बँकेसमोरून जात होते. त्यावेळी अचानक समोरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी यंबल यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांनी यंबल यांच्याकडील 2 लाख 21 हजार 90 रुपयाची चैन आणि ब्रासलेट चोरले.

fake police cheat the trader in Hingoli
तोतया पोलिसांनी व्यापऱ्याला घातला 2 लाखाचा गंडा

हिंगोली- शहरात 2 तोतया पोलिसांनी एका व्यापाऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले आहे. या तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याकडून 2 लाख 21 हजार 90 रुपयांची सोन्याची चैन आणि ब्रासलेट लांबवले आहे. या प्रकरणी अभयकुमार यंबल यांनी 2 अज्ञात आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर, हिंगोलीत मोर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी अभयकुमार यंबल हे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील अॅक्सिस बँकेसमोरून जात होते. त्यावेळी अचानक समोरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी यंबल यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांनी यंबल यांच्याकडील 2 लाख 21 हजार 90 रुपयाची चैन आणि ब्रासलेट चोरले. या प्रकाराने भांबावून गेलेले यंबल यांनी हा प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला व थेट शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली.

हेही वाचा - रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत तोतया पोलिसांनी पळ काढला होता. पोलीस या 2 तोतया पोलिसांचा तपास करत आहेत. याप्ररणी अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.

Intro:

हिंगोली- शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे तर सत्र वाढलेलेच आहे. भर दिवसा चार ठिकाणी झालेल्या चोऱ्यामुळे तर नागरिकां मधील भीती अजूनही कमी झालेली नाही. तोच आता या तोतया पोलिसाने एका व्यापाऱ्याला खराब दिवस असल्याचे सांगत 2 लाख 21 हजार 90 रुपयांचे सोन्याची चैन अन ब्रासलेट लांबवून गंडा घातलाय. या प्रकरणी अभयकुमार यंबल यांच्या फिर्यादिवरून दोन अज्ञात आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Body:व्यापारी अभयकुमार यंबल हे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील अॅक्सिस बँके समोरून जात होते. अचानक समोरून दोन अनोळखी व्यक्ती आले अन त्यांनी यंबल यांना थांबविले. 'आम्ही पोलिस आहोत असे सांगत सध्याचे दिवस हे अतिशय खराब आहेत. असे म्हणत यंबल यांच्याकडील 2 लाख 21हजार 90 रुपयाची पुण्याची चैन आणि ब्रासलेट पोलिसांनी गायप केले. या प्रकाराने भांबावून गेलेले यंबल यांनी हा प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला व थेट शहर पोलीस ठाणे गाठले. अन घडलेला प्रकार सांगितला. Conclusion:पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत तोतया पोलिसानी पळ काढला होता. या प्रकाराने मात्र हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस त्या दोन तोतयाचा तपास करीत आहेत. मात्र या प्रकाराने पुन्हा हिंगोली शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे तोतया पोलीस कोण आहेत या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तपास शहर पोलीस ठाण्याचे पोउपनी कांबळे हे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.