हिंगोली - काहीच नाही आपण आपले कर्तव्य छान पद्धतीने पार पाडायचे, फळाची तुम्ही अजिबात अपेक्षा करू नका, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आपण धीर देणे नितांत गरजेचे असते. आपण त्यांच्यासाठी खुप महत्वाचे असतो, हीच ती योग्य वेळ आहे. आपले खरे कर्तव्य दाखवण्याची. त्यामुळे तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा, फळ तुम्हाला आपोआप मिळत असल्याचा सल्ला कोरोना वार्डमध्ये आठ दिवस राबलेल्या कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येणाऱ्या जयश्री फत्तेपुरे यांनी कोरोनाला हरविण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टर, परिचरिकांना सल्ला दिला आहे. शल्यचिकित्सक किशोर श्रीवास म्हणतात हा पुरस्कार त्यांचा आहे, जे रात्रंदिवस कोरोनाला हरविण्यास धडपड करतात.
तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा, फळ तुम्हाला आपोआप मिळते संपूर्ण जगभरात हाहाकार मचवलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र धावपळ करत आहे. त्यामुळेचे संपूर्ण राज्यात कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या 38 कोरोना योद्ध्यांचा मुंबई येथील राजभवनमध्ये 15 ऑक्टोबरला गौरव केला जाणार आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातून चार आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका जयश्री फत्तेपुरे, कक्ष सेवक संदीप मोरे अन आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका शोभा तोरकड अशी निवड झालेल्यांची नावे आहेत. तर अधिपरिचरिका जयश्री या कोरोना वार्डमध्ये केवळ आठ दिवस कर्तव्य बजावलेल्या आहेत. सेवा बजावत असताना, त्यांचे उत्कृष्ट काम बघून, त्याना ओपीडीमध्ये स्क्रिनिंग अन् केस पेपर देण्याची जबाबदारी इंचार्ज सिस्टरने सोपवली. तेव्हापासून स्क्रिनिग अन केस पेपरची जबाबदारी अतीशय चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. प्रत्येक रुग्णांना चांगल्या प्रकारे वागणुक देणे, वार्डची माहिती कळविणे. त्यामुळे जयश्री यांच्या कामाची रुग्णालयात चांगलीच ओळख आहे. कोरोनावार्डमध्ये पहिल्या रुग्णापासून ते आज तगायत ज्या परिचारिकाना कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना स्वतःला कोरोनाची लागण झाली. बरे झाल्यानंतरही त्यानी वार्डात परत कर्तव्य बजावले. मात्र, त्यांच्या ही तुलनेत जयश्री फत्तेपुरे यांचे काम हे खरोखरेच वाखण्याजोग असल्याचे इतर परिचारिका सांगत होत्या. त्यामुळे जयश्री यांचा गौरव म्हणजे आम्हा सर्वांचा गौरव असल्याचे इंचार्ज ज्योती पवार यांनी सांगितले. याच ओपीडी कक्षात तर काही परिचारिका या 2 ते अडीच महिन्यांचे बाळ देखील सोडून कर्तव्य बजावलेल्या आहेत. मात्र, या निवडीने त्यांच्या देखील कार्याचा सन्मान झाला आहे. जयश्री यांच्याकडून खरेच काही तरी शिकायला मिळते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळत गेली. आम्ही पण आमचे कर्तव्य बजावत गेलो, पुरस्कार, वैगरे आम्हाला मिळेल की नाही. याचे आम्हाला भान देखील नव्हते, फक्त काम अन वरिष्ठांच्या आदेशाचे पालन हेच आमच्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे. मात्र, आम्ही चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे, ही पवार यांनी सांगितले.
नावांची यादी बद्दलल्याचा आरोप
राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार मिळण्यासाठी जी सामान्य रुग्णालयातून यादी पाठवण्यात आली होती. ती यादी दुसरीच आहे. मेट्रनकडून आलेली यादी मुळात पाठवलीच गेली नसल्याने, खरे कोरोना योद्धे हे पुरस्कारापासून वंचित आहेत. त्यामुळे नावांची लिस्ट पाठवताना थोडा तरी विचार व्हायला होता असे काही परिचरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एकाचा म्हणजे सर्वांचाच गौरव
राज्यपालांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील दोघांची निवड केली म्हणजे सर्वांचीच निवड झाल्या सारखे आहे. दोघांचा गौरव होतो म्हणजे संपूर्ण रुग्णालयाचा गौरव होत आल्याचे तत्कालीन शल्यचिकित्सक किशोर श्रीवास म्हणाले.