ETV Bharat / state

पिकाला पाणी देणाऱ्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू - hingoli latest news

तरुणाचा शेताला पाणी देत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. शनिवारी शेतात विद्युत तार तुटून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

विजेचा धक्का लागून मृत्यू
author img

By

Published : Nov 16, 2019, 11:25 PM IST

हिंगोली - रब्बीचा हंगाम सध्या जोरात सुरू असून विद्युत पुरवठा सुरू असेल तेव्हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. अशाच एका तरुणाचा शेताला पाणी देत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा.. व्यापारी अन् हमाल यांच्या बंद आंदोलनामुळे शेतमाल बाजारात पडून

माधव शेषराव फुपाटे (वय 17 रा. घोरदरी ता. सेनगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. माधव आणि त्यांचे वडील हे शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. माधव वडिलांपासून काही अंतरावर जाऊन हळदीला पाणी देत होता, तर वडील त्याला बॅटरीचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेवर माधवचा पाय पडला आणि तो जागीच कोसळला. ही बाब वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ माधवकडे धाव घेतली अन् हातातील लाकडाने त्याला बाजूला केले. हा प्रकार त्यांनी आपल्या घरच्यांना कळविली.

हेही वाचा - हिंगोलीत कारभार सुधारण्यासाठी रुग्णालयाला खासदारांनी दिला आठ दिवसांचा वेळ

नातेवाईकांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली आणि माधवला रिसोड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून माधवला मृत घोषित केले. शेतात विद्युत तार तुटून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. खरीप पूर्णपणे हातचा गेल्यामुळे निदान खरिपाची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी जीवाची जराही पर्वा न करता रब्बी पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच ही घटना घडली, त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी पाणी देताना मोठी काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. माधवच्या पश्चात पाच बहिणी, एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. माधवच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात माधवच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.

Intro:

हिंगोली- सध्या रब्बीचा हंगाम जोरात सुरू असून जेव्हा विद्युत पुरवठा सुरू असेल तेव्हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत अशाच एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Body:माधव शेषराव फुपाटे (17) रा. घोरदरी ता. सेनगाव असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. माधव आणि त्यांचे वडील हे शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. माधव वडीला पासून काही अंतरावर जाऊन हळदीला पाणी देत होता तर वडील त्याना बॅटरीचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, जमिनीवर सुटलेल्या विद्युत तारेवर माधव चा पाय पडला आणि तो जागीच कोसळला ही बाब वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ माधव कडे धाव घेतली अन् हातातील लाकडाने त्याला बाजूला केले. ही बाब माधवच्या वडिलांनी आपल्या घरच्यांना कळविली. नातेवाईकांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली आणि माधवला रिसोड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात दाखल करतात डॉक्टरांनी तपासून माधवला मयत घोषित केले. माधव त्या शेतामध्ये विद्युत आर तुटून पडल्याने सदरील घटना घडली. खरीप पूर्णपणे हातचा गेल्यामुळे निदान खरिपाची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी जीवाची जराही पर्वा न करता रबि पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करतायेत. अशातच ही घटना घडली त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी पाणी देताना मोठी काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.Conclusion:माधवच्या पश्वात पाच बहिणी, एक भाऊ, आई वडील असा परिवार आहे. माधवच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीत च्या कार्यालयात माधवच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.