ETV Bharat / state

हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल

प्रत्येक वर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करताना अनेकजण ओल्या पार्टीचा जंगी बेत आखतात. रात्रभर धिंगाणा घातला जातो, यावेळी अनेकदा मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते

Hingoli
हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 24 जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jan 1, 2020, 10:48 AM IST

Updated : Jan 1, 2020, 11:49 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून जुने वर्ष संपण्याच्या व नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 14 वाहने जप्त करण्यात आली. तर शहर पोलीस ठाण्यात दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 24 जणांवर गुन्हा दाखल

हेही वाचा - गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत; अपघातमुक्तीचा संदेश

प्रत्येक वर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करताना अनेकजण ओल्या पार्टीचा जंगी बेत आखतात. रात्रभर धिंगाणा घातला जातो, यावेळी अनेकदा मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे थर्टी फर्स्टला पोलीस अधिकारी, कर्मचारीही गोंधळ होऊ नये, म्हणून रस्त्यावर आपले कर्तव्य बजाविण्यासाठी सज्ज होते.

हेही वाचा - दुचाकी आणि बसच्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर; मदतीऐवजी लोक करत होते चित्रीकरण

ही मोहीम रात्री उशिरापर्यंत राबवण्यात आली. तर दुसरीकडे खटकाळी बायपास भागात पहाटे 5 वाजेपर्यंत वाहन चालकांना 1 ग्लास दूध देत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचाही उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अनेकांनी दुधाचा लाभ घेतला.

Intro:
हिंगोली- जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या वतीने जुने वर्ष संपण्याच्या व नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या ड्रिंक अँड ड्राइव्ह मोहीम राबवून 14 जणांनावर गुन्हा दाखल करून 14 वाहने जप्त केलीत. तर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या दहा जनावरं हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर सामाजिक संघटना अन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शहरात नववर्षाच्या वाहन चालकांचे दूध पाजून नववर्षाचे स्वागत केले.

Body:सरत्या वर्षाला निरोप अन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिंगोली जिल्ह्यात नवंवर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी ओल्या पार्त्याचे नियोजन केले होते. यावर पोलीस प्रशासन अति बारकाईने लक्ष ठेऊन होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. एवढेच नव्हे तर वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोळकर यांनी शहरात अनेक ठिकाणी मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली. अन त्यांच्याकडील वाहने जप्त केले. पोलिसांना जुगारा देऊन वाहन चालक कट मारण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्यांचा पाठलाग करीत चालकांची तपासणी केली जात होती. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या 14 जनावर गुन्हे दाखल केले आहेत. तर 14 वाहने जप्त केलीत. त्याच बरोबर दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या 10 जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Conclusion:ही मोहीम रात्री उशीरा पर्यन्त राबवण्यात आली. तर दुसरीकडे खटकाळी बायपास भागात पहाटे पाच वाजेपर्यंत वाहन चालकांना एक ग्लास दूध देत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचा देखील उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनेकांनी दुधाचा लाभ घेतला.
Last Updated : Jan 1, 2020, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.