ETV Bharat / state

पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच - सुनील केंद्रेकर

author img

By

Published : Nov 20, 2019, 1:51 PM IST

मोबाईलवर विमा कंपनीकडून वेगवेगळे संदेश येत असतील तरीही त्याबाबत चिंता करू नये. ज्यांचे अर्ज स्वीकारले असतील, त्यांना नुकसानीचे पैसे देणे बंधनकारक असल्याचे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा हिंगोली दौरा

हिंगोली - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे बुधवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हमखास मदत मिळणारच, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

विभागीय सुनील केंद्रेकर यांची प्रतिक्रिया...

मोबाईलवर विमा कंपनीकडून वेगवेगळे संदेश येत असतील, तरीही त्याबाबत चिंता करू नये. ज्यांच्या पिकांचे पंचनामे झाले आहे. व ज्यांचे अर्ज स्वीकारले असतील, त्यांना पैसे देणे बंधनकारक असल्याचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा... दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, येत्या दोन दिवसात पेच सुटण्याची शक्यता

हिंगोली जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मूळ गावाला भेट दिली. प्रारंभी आयुक्तांनी येलदरी धरणास भेट देत, तेथील गळतीची पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले. नंतर वनविभागाच्या रोपवाटीकेची पाहणी केली. गावी जाताना त्यांना नरसी येथे संत नामदेवांचे दर्शन घेतले, नंतर त्यांनी गावास भेट दिली. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर माध्यमाशी सवांद साधला.

हेही वाचा... जगातील कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी

संपूर्ण मराठवाडा आपण फिरलोय. मुसळधार पावसाने संपूर्ण मराठवाड्यातच नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीसाठीच सरकारच्या मदतीची गरज असते, राज्यपालांनी ती मदत जाहीर केली आहे. तसा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. या मदत वाटपाचे नियम हे पीक विमा वाटप पद्धतीपेक्षा वेगळे असतात. पीक विमा कंपनीच्या तक्रारीची बाब आपल्याला समजली आहे. त्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे माहिती घेतलेली आहे, असे केंद्रेकर यावेळी म्हणाले. पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करावेत, अन्यथा आम्ही केलेले पंचनामे हे कंपनीला मान्यच करावे लागतील, असे स्पष्ट शब्दात केंद्रेकरांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... एकनाथ शिंदे बोलतात एक वागतात एक, ठाणे काँग्रेसचा आरोप

आयुक्त केंद्रेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात त्यांनी आपले गावाविषयी असलेले प्रेम बोलून दाखवले. तसेच बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गावाचा कायापालट करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विविध शासकीय योजनातून गावाचा विकास करण्यासाठी तोंडी सूचना दिल्या. तसेच अनेक दिवसांपासून दारूबंदीसाठी सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीवर अद्याप कारवाई का केली नाही? याबाबत गोरेगाव पोलिसांना त्यांनी विचारणा केली.

हेही वाचा... जेसीबीने बैलाला ठार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल; इंदापूर तालुक्यातील घटना

Intro:जर प्रीमियम ऍक्सेस केले असेल तर पीक विमा देणं बंधनकारकच आहे - सुनील केंद्रेकर

हिंगोली- आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हा दोऱ्यावर आले होते. त्यानी जिल्ह्यातील पीक परिस्थिती ची पाहणी केली असता खरोखरच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येतंय. मात्र पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याना हमखास मदत मिळणार म्हणजे मिळणारच. जरी आपल्या मोबाईलवर विमा कंपनी कडून वेगवेगळे संदेश झळकत असतील तर त्यानी तुमचे अर्ज स्वीकारले असतील तर त्याना विमा देणंही देणं असल्याचे प्रखरपणे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. अन नागरिकांच्या तक्रारीवरून शासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना ही चांगलेच धारेवर धरले.

Body:हिंगोली जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हा दोऱ्यावर आले असता, त्यांनी त्यांच्या केंद्रा बु, या मूळ गावी भेट दिली. प्रारंभी आयुक्तांनी यलदरी धरणास भेट दिली. गळतीची पाहणी करून दुरुस्ती चे आदेश दिले. नंतर वनविभागाच्या रोपवटीकेची पाहणी केली अन गावी जाता जाता नरसी नामदेव येथे संत नामदेवांचे दर्शन घेतले. अन नंतर गावास भेट दिली. गावात प्रवेश करताच शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. नंतर माध्यमाशी सवांद साधला. मी संपूर्ण मराठवाडा फिरलोय, मुसळधार पावसाने संपूर्ण मराठवाड्यातच नुकसान झालेले आहे. येथेही यलदरी मार्गे आलोय खरोखरच नुकसान भरपूर झालंय. आशा परिस्थिती साठी एन डी आर ची मदत असते आपल्यासाठी ती राज्यापालने जाहीर ही केलीय. तसा शासन निर्णय देखील निघालाय. जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येईल अन तेथून वाटपाची सुरुवात होणार आहे. या मदत वाटपाचे नियम हे पीक विमा वाटप पद्धतीच्या वेगळे असतात. तर पीक विमा कंपनीच्या तक्रारी ची बाब ही स्वतः माझ्याही कानावर आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे माहिती घेतलेली आहे. जो विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे त्याला ही मी बोललो असल्याचे सांगितले. पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करावेत अन्यथा आम्ही केलेले पंचनामे हे कंपनीला मान्यच करावे लागतील असे ही स्पष्ट शब्दात सांगितले. एवढेच नव्हे तर कृषी सचिवाशी देखील बोलणे झालेय तर लेखी स्वरूपात दोन्ही ही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. या संदर्भात मुंबई येथे महासचिवा सोबत बैठक ही झालेली आहे. यावरून हे स्पष्ट होतेय की, पीक विमा कंपन्याना जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेय ते त्यानी आमच्या पंचनाम्या नुसार देयलाच हवे. वरिष्ठ सरावरूनही प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

प्रशाकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आयुक्त केंद्रेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात आपले आपल्या गावाविषयी असलेले प्रेम सांगत बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला. तर गावाचा कायापालट करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध शासकीय योजनांतुन गावाचा विकास करण्यासाठी तोंडी सूचना दिल्या. तसेच अनेक दिवसांपासून दारू बंदी साठी सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीवर अद्याप का कारवाई केली नसल्याचे गोरेगाव पोलिसांना विचारले. कारवाई करण्याची पद्धत सांगत कारवाई झाल्यानंतर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

*Conclusion:सेनगाव तहसीलदाराची मेहनत पाण्यात*

आयुक्त येणार असल्याच्या धास्तने हिंगोली प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
सेनगाव तहसील परिसरात पेरलेल्या तुरीवर रोटावेटर फिरवून अन लहान लहान रोपटे लावण्यासाठी मोठं मोठे वृक्ष तोडण्यात आले. आयुक्त येण्या अगोदर वृक्ष लावगड तर केलीच मात्र त्याकडे आयुक्तांनी साधे वळूनही पाहिले नाही. वरून तहसीलच्या व्हरांड्यात वृक्ष लावंगड करण्याच्या सूचना आयुक्तांनी तहसीलदार जीवन कांबळे यांना दिल्या. मात्र मोठ्या मेहनतीने लावगड केलेल्या वृक्ष लावगडी कडे साधे वळूनही पाहिले नसल्याने तहसीलदाराच्या मेहनतीवर पाणी तर फिरलेचग मात्र तुरीचे पीक देखील पाण्यात गेले.

व्हिज्युअल मोजो वरून अपलोड केलेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.